एक्स्प्लोर
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत हरभजन सिंग म्हणतो...
नवी दिल्ली : टीम इंडियाचा फिरकीपटू भज्जी अर्थात हरभजन सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर भज्जी पंजाबमधून निवडणूक लढवणार असल्याच्या अफवांना उत आला होता, मात्र अखेर हरभजनने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
'नजीकच्या काळात राजकारणात प्रवेश करण्याचा आपला कोणताही विचार नाही. त्यामुळे अफवा पसरवणं थांबवा' अशा स्पष्ट शब्दात हरभजनने खडसावलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हरभजन काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश करुन तो एखादी जागा लढवेल, अशी अटकळ बांधली जात होती.
https://twitter.com/harbhajan_singh/status/811813997716664325
नवज्योत सिंह सिद्धू यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर भज्जीच्या काँग्रेसप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement