Gyanvapi Mosque Verdict: ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार; 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी
Gyanvapi Masjid Case Update: ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय कोर्टानं दिलाय. आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
Gyanvapi Masjid Case Update: ज्ञानवापी प्रकरणी (Gyanvapi Mosque Case) मोठा निर्णय वाराणसी (Varanasi Court) कोर्टानं दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ज्ञानवापी प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयानं हिंदू पक्षकाराच्या बाजून निकाल देत सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य केस न्यायालयात चालविण्यायोग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मशीद कमिटीचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.
Uttar Pradesh | The court rejected the Muslim side's petition and said the suit is maintainable. The next hearing of the case is on Sep 22: Advocate Vishnu Shankar Jain, representing the Hindu side in the Gyanvapi mosque case pic.twitter.com/EYqF3nxRlT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 12, 2022
जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या 5 पैकी 3 फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ 40 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता.
#WATCH | Varanasi, UP: "Bharat is happy today, my Hindu brothers & sisters should light diyas to celebrate," says petitioner from Hindu side Manju Vyas as she dances & celebrates the Gyanvapi Shringar Gauri verdict pic.twitter.com/hO7frpErNF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 12, 2022
ज्ञानवापी मशीद खटल्यात हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं की, न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आणि दावा कायम ठेवण्यायोग्य असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा हिंदू समाजाचा विजय आहे.
याचिकाकर्ते सोहनलाल आर्य यांनी म्हटलं आहे की, पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी आहे. ज्ञानवापी मंदिराची ही पायाभरणी आहे. हा तमाम हिंदूंचा विजय आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.