(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gyanvapi Case : ज्ञानवापीत वजुखाना की शिवलिंग? आज जिल्हा न्यायालयात होणार युक्तिवाद; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी
Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणातील सर्वेक्षणाशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे दोन्ही बाजूंना देण्यात येणार आहेत. तर आज वाराणसी न्यायालयाबाहेर शिवतांडव स्तोत्राचे पठण करण्यात येणार आहे.
Gyanvapi Case : ज्ञानवापीत वजुखाना की शिवलिंग? आज जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात यावर युक्तिवाद होणार आहे. दुपारी 2 वाजता न्यायालयीन कामकाज सुरू होईल आणि अंजुमन इंसंजारिया मस्जिद समितीच्या वतीने संपूर्ण प्रकरण फेटाळण्यासाठी युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्याचवेळी ज्ञानवापी परिसरातील शिवलिंगाचे पुरावे सादर करणार असून त्यावर खटला चालवण्याची बाजू मांडण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे दोन्ही बाजूंना देण्यात येणार
याआधी 26 मे रोजी मुस्लीम पक्षाच्या वतीने अनेक युक्तिवाद करण्यात आले, ज्यामध्ये हे प्रकरण रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. यादरम्यान मुस्लिम बाजूने हिंदू बाजूची याचिका फेटाळण्याची मागणीही केली होती तसेच ज्ञानवापी परिसरात शिवलिंग नसून वजुखान्यातील कारंजा असल्याचा दावाही केला होता. याशिवाय 'प्लेसेस ऑफ वर्शप अॅक्ट'वरही कोर्टात चर्चा झाली. या युक्तिवादा दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणातील सर्वेक्षणाशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे दोन्ही बाजूंना देण्यात येणार आहेत.
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी
इतकेच नाही तर ज्ञानवापी परिसर हिंदूंच्या ताब्यात देण्याच्या याचिकेवरही आज वाराणसीच्या जलदगती न्यायालयात सुनावणी होणार आहे. विश्व वैदिक सनातन संघाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संघाने दाखल केलेल्या याचिकेवर वाराणसीतील महेंद्र पांडे यांच्या जलदगती न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत दावा करण्यात आला आहे की , मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली असून मस्जिद समितीशिवाय उत्तर प्रदेश सरकारलाही पक्षकार बनविण्यात आले आहे.
आज वाराणसी न्यायालयाबाहेर शिवतांडव स्तोत्राचे पठण
ज्ञानवापी परिसरात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी, तसेच ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या बाजूने सोपवावे, अशी विश्व वैदिक सनातन संघाची मागणी आहे. एवढेच नाही तर मशिदीचा घुमट काढून पूजेसाठी परवानगीही मागितली आहे. याशिवाय ज्ञानवापी मुक्ती महापरिषदेनेही आज वाराणसी न्यायालयाबाहेर शिवतांडव स्तोत्राचे पठण करण्याची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या :
Asaduddin Owaisi : भिवंडीमध्ये असदुद्दीन ओवैसींची सभा, भोंगा, ज्ञानवापीवर काय बोलणार?
Asaduddin Owaisi: भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? असदुद्दीन औवेसी यांचा सवाल
Gyanvapi Controversy : ज्ञानवापी मशिदीनंतर आता टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीवर प्रश्न उपस्थित; जामा मशिद हनुमान मंदिर असल्याचा दावा