20 महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार, हिंस्त्र कृत्याने मृत्यू, नराधमाला फासावर लटकवण्याचे कोर्टाचे आदेश
Rape And Murder Case : अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने 23 वर्षीय युवकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ( death sentence) सुणावली आहे.

Rape And Murder Case : अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने 23 वर्षीय युवकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ( death sentence) सुणावली आहे. इस्माइल उर्फ इस्माइल यूसुफ हाजात असे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश शकुंतला सोळंकी यांनी 31 जुलै रोजी इस्माइल उर्फ इस्माइल यूसुफ हाजात याला दोषी ठरवले होते. आज फाशीची शिक्षा सुनवाली आहे. त्याशिवाय पीडित कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याचा आदेश दिलाय.
गुजरातमधील सुरत येथील स्पेशल कोर्टात इस्माइल उर्फ इस्माइल यूसुफ हाजात याच्याविरोधात सुनावणी झाली. 20 महिन्यांच्या चिमुकीलचा बलात्कार केल्याचा आरोप इस्माइल याच्याविरोधात होता. फेब्रुवारी महिन्यातील हे प्रकरण आहे. 23 वर्षीय इस्माइल याला सोमवारी 31 जुलै रोजी कोर्टाने दोषी ठरवले. भादवि कलम 302 (हत्या), 376 एबी (12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार, न्यायाधीश शकुंतला सोळंकी यांनी इस्माइल याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
वकील नयन सुखदवाला यांनी सांगितले की, न्यायाधीश शकुंतला सोळंकी यांनी भादवि कलम 364 (पीडितेची हत्या करण्यसाठी अपहरण करणे) आणि कलम 366 (बलात्कार करण्यासाठी पीडितेचं अपहरण करणे ) याअंतर्गत आरोपीला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पीडित कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याचा आदेश -
सूरत न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची दखल घेत आरोपीला 10 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. वकील नयन सुखदवाला यांनी सांगितले की, 20 महिन्यांच्या चिमुकलीच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. तसेच पोटावर चावा घेतल्याच्या खुणा होत्या.
ओळखीतलाच आरोपी -
पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, इस्माइल हा मुलीच्या वडिलांच्या ओळखीचा होता. त्यामुळे घरी त्याचे ये जा होत होते. 27 फेब्रुवारी रोजी इस्माइल 20 महिन्यांच्या त्या चिमुकलीला सोबत घेऊन गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही इस्माइल आलाच नाही, त्यामुळे कुटुंबाला चिंता वाटू लागली. कुटुंबांनी बाळाचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले अन् तक्रार दिली.
काही तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह मिळाला -
पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतरही कुटुंबांनी मुलीचा शोध सुरुच ठेवला होता. काही तासानंतर कपलेथा गावात एका इमारतीच्या मागे असलेल्या विहिरीजवळ चिमुकलीचा मृतदेह मिळाला. इस्माइल त्यावेळी फरार होता. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य पाहून आरोपीचा शोध सुरु केला. सूरतजवळील गावातून 28 फेब्रुवारी रोजी इस्माइल याला बेड्या ठोकल्या. बलात्कार आणि हत्या असा दुहेरी गुन्हा इस्माइलवर लावला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. आज कोर्टाने इस्माइल याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. त्याशिवाय पीडित कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याचे आदेशही दिले.
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















