एक्स्प्लोर

Gujrat Fire : गुजरातमध्ये आगीचे तांडव, गेम झोन जळून खाक , 20 जणांचा मृत्यू

Gujrat, Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमधील एका गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Gujrat, Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमधील एका गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही घटना शनिवारी (दि.25) घडलीये. दरम्यान आग कशामुळे लागली याबाबत आम्ही तपास करत असल्याचे राजकोटच्या पोलीस कमिशनर यांनी सांगितले आहे. शिवाय, शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याचे आदेशही पोलीस कमिश्नरांनी दिली आहेत. 

गुजरातमध्ये आगीचे तांडव, गेम झोन जळून खाक 

गेमझोनला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला असला तरी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही अनेक लोक अडकले असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण गेम झोन जळून खाक झाले आहे. पोलीस कमिशनर राजीव भार्गव आणि जिल्हाधिकारी आनंदर पटेल घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गेम झोनपासून 5 किलोमीटर दूरपर्यंत आगीचे लोट 

 कालावड रोडजवळील टीआरपी गेम झोनला आग लागल्याची ही घटना आहे. आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. गेम झोनच्या आगीचे लोट 5 किलोमीटर अंतरापर्यंत दूर पसरले आहेत. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. 

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल काय म्हणाले? 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेबाबत ट्वीटरवरुन भाष्य केलं आहे. "राजकोटच्या गेम झोनमध्ये आग लागल्याची घटना घडलीये. मी प्रशासनाला बचाव कार्यासंबंधी सर्व सूचना दिल्या आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असं भुपेंद्र पटेल यांनी म्हटलं आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आरए जोबन म्हणाले, "आम्ही  मृतांची नेमकी संख्या सांगू शकत नाही. आम्ही दोन्ही बाजूंनी मृतदेहखाली आणत आहोत. शोध मोहीम सुरू आहे."

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Shendge on Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्तावर उतरेल, प्रकाश शेंडगेंचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget