एक्स्प्लोर

Prakash Shendge on Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्तावर उतरेल, प्रकाश शेंडगेंचा इशारा

Prakash Shendge on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी परत आता चार तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र,  मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्तावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

Prakash Shendge on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) परत आता चार तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र,  मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्तावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. सगेसोयरेंच्या निर्णयाचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाच्या धडपशाहीला त्याठिकाणी बळी पडून जर सरकारने असं काही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, तर  OBC समाज जो आहे तो पुन्हा रस्त्यावर उतरेल, असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. 

कमी वेळामध्ये साधनं आणि आर्थिक मदत नसतानाही निवडणूक लढलो

प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसी बहुजन पार्टी हा आमचा पक्ष लोकसभा निवडणुकीत नवीन असताना देखील आम्ही 16 उमेदवार उभे केले आहेत. 13 उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढलेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मैदानामध्ये आहोत. ओबीसी बहुजन पार्टी निवडणुकीत उतरली आहे. ही निवडणूक कमी वेळामध्ये साधनं आणि आर्थिक मदत नसताना आम्ही एवढा मोठा प्रमाणात ही निवडणूक लढलो.  जय आणि पराजयाची आम्हाला चिंता नाही. किंवा त्याचा पर्वाही नाही. येणारी विधानसभा निवडणूक मात्र पूर्ण ताकतीने लढणार आहोत. उद्या आमची कार्यकारणीची बैठक आहे, त्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जायचं, याची रडनीती ठरणार आहे. 

ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर शासनाच्या विरोधात आंदोलन करू

पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर जिल्ह्याजिल्ह्यामध्ये शासनाच्या विरोधात आंदोलन करून या ठिकाणी प्रचंड मोठा उद्रेक होईल. त्यातून जे काय परिणाम होतील सर्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर असेल. कुणबी आणि मराठा हे हा एकच आहे, असा विषय आलेला आहे. पुढे पण हा विषय सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने निकालात लावलेला आहे. खत्री कमिशनने कुणबींमध्ये मराठा येत नाही, अशा अहवालात त्या मेन्शन केला आहेत. येत्या मंगळवारी आमचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि भुजबळ साहेबांना भेटणार आहे. आता नवीन विषय चालू आहे ते ताबडतोड थांबवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Sunil Raut on Ashish Shelar : मोदी 10 वर्षात जग फिरुन आले, पण उद्धवसाहेब लंडनला गेले तर यांच्या पोटात दुखतय, सुनील राऊतांचा आशिष शेलारांवर हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Embed widget