Gujarat Election Result : अल्पेश-हार्दिक-जिग्नेश आघाडीवर की पिछाडीवर? वाचा युवा नेत्यांची काय स्थिती?
Gujarat Election Result : गुजरात विधानसभेचे कल येण्यास सुरुवात झाली असून, भाजप आघाडीवर आहे. या निवडणुकीत अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांची काय स्थिती आहे ते पाहुयात.
Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये (Gujarat) कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सध्या भाजप (BJP) आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) पिछाडीवर आहे. तर दुसरीकडं आम आदमी पक्षानं गुजरातमध्ये खातं खोललं आहे. 10 जागांवर आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार आघाडीवर आहेत. असे असले तरी संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, गुजरातच्या निवडणुकीत चर्चेच असणारे युवा नेते अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल (Hardik Patel) आणि जिग्नेश मेवाणी ( Jignesh Mewani) हे तिघेही सध्या पिछाडीवर आहेत.
2017 ला वेगळं समीकरण
2017 साली गुजरात विधानसभेची समीकरणं वेगळी होती. या निवडणुकीत बरेच बदल झाले आहेत. 2017 च्या निवडणुकीत अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी या तिन्ही नेत्यांची जोरदार चर्चा झाली होती. मागच्या निवडणुकीत हे तिन्ही नेते काँग्रेसमध्ये होते. मात्र, या निवडणुकीत यामधील अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर जिग्नेश मेवाणी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळं आता तेथील राजकीय समीकरणं बदलली आहेत.
हार्दिक पटेल विधानसभेत पोहोचणार का?
पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दिक पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्येचं होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने हार्दिक पटेल यांना त्यांच्या मूळ विरमगाम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते. 2017 मध्ये, काँग्रेसचे लखाभाई भारवाड यांनी भाजपच्या डॉ. तेजश्रीबेन दिलीप कुमार पटेल यांचा 6 हजार 548 मतांनी पराभव करून जागा जिंकली होती. यावेळी हार्दिक पटेल यांचा सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भारवाड यांच्याशी होते आहे.
कोण आहेत अल्पेश ठाकूर?
अल्पेश ठाकूरहे ओबीसी समाजाचे मोठे नेते मानले जातात. पाच वर्षांपूर्वी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अल्पेश ठाकूर काँग्रेसचे उमेदवार होते. यावेळी मात्र ते भाजपच्या झेंडा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपने अल्पेश यांना गांधीनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अल्पेश यांचा काँग्रेसच्या हिमांशू पटेल आणि आम आदमी पक्षाचे देवेंद्र पटेल यांच्याशी सामना आहे. गांधीनगर दक्षिण ही जागा गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, त्यानंतरही अल्पेश ठाकूर पिछाडीवर आहेत.
कोण आहेत जिग्नेश मेवाणी?
जिग्नेश मेवाणी हे गुजरातमधील दलिता समाजाच्या बड्या नेत्यांमध्ये एक आहेत. जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या तिकिटावर वडगाम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी आमदार मणिलाल वाघेला यांच्याशी आहे. या जागेवर आप आणि एआयएमआयएमचे उमेदवारही रिंगणात आहेत. सध्या जिग्नेश मेवाणी पिछाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: