एक्स्प्लोर
75 रुपयांचं नाणं लवकरच चलनात येणार!
"या नाण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा छापलेली असेल. सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा नाण्यावर मुद्रित केली जाणार आहे," असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

नवी दिल्ली : बाजारात लवकरच 75 रुपयांचं नाणं चलनात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथे पहिल्यांदा तिरंगा फडकावल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून, केंद्र सरकार 75 रुपयांचे नाणं चलनात आणणार आहे. अर्थ मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
नाण्यात खास काय?
अधिसूचनेनुसार, 75 रुपयांच्या या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आण 5 टक्के झिंक आणि 5 टक्के जस्त धातूपासून हे नाणं बनवलं जाणार आहे.
"या नाण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा छापलेली असेल. सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा नाण्यावर मुद्रित केली जाणार आहे," असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
त्यांच्या प्रतिमेखाली 75 अंक लिहिला आहे. यासोबतच नाण्यावर देवनागरी आणि इंग्लिशमध्ये ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ ही लिहिलेलं असेल. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये 30 डिसेंबर, 1943 रोजी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता.
दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला होता. तसंच आजाद हिंद सरकारच्या स्थापनेची 75व्या वर्षानिमित्त स्मारक पट्टिकेचंही अनावरण केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सोलापूर
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
