कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स
कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती तयार करणार आहे. निती आयोग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या समन्वयाने देशात लसीचं वितरण होणार आहे.
![कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स Govt sets up task force for vaccine distribution in india कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/08230431/vaccine.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणू संसर्गावरील लस ह्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे ही लस मिळवून ती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारने वॅक्सीनची ओळख, खरेदी, वितरण आणि लसीकरणासाठी एका टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्समध्ये मंत्रिमंडळ आणि संस्थांमधील प्रतिनिधीचा समावेश असणार आहे. देशातील 6 लस ह्या फेज 3 मध्ये तर काही संयुक्तपणे 2-3 टप्प्यात आहेत. त्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. त्यामुळे आता सरकारनेही आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत.
या संदर्भातील लोकांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, या टास्क फोर्सचे नेतृत्व निती आयोगाचे डॉ. वीके पॉल करणार आहे तर सह-अध्यक्ष आरोग्य सचिव राजीव भूषण असणार आहेत. ही समिती भारतासाठी एकपेक्षा जास्त वॅक्सीनची ओळख करणार करुन खरेदीसाठी योजना आखणार आहे, ज्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असेल. सोबतच लसीकरणासाठीही प्लॅन तयार करण्यात येणार आहे.
Serum Institute | सीरम इन्स्टिट्यूटची कोविड लस फक्त 225 रुपयांत मिळणार; गेट्स फाउंडेशनचा पुढाकार
लस उपलब्ध होईपर्यंत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि विनाकारण बाहेर फिरण्यावर निर्बंध घालणे हेच उपाय आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. शुक्रवारी रात्री पर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात 1 कोटी 93 लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. तर 7 लाख 20 हजार लोकांचा यात बळी गेला आहे. भारतातही 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 42 हजार लोकांचा आतापर्यंत कोरोनाने जीव घेतला आहे.
कोरोनावर लस तयार करणारा रशिया पहिला देश जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. खास गोष्ट म्हणजे, वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याील क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरु आहे.
Corona Vaccine | अवघ्या 250 रुपयांना मिळणार सीरमची कोरोनावरील लस, 2021 पर्यंत 100 दशलक्ष लसी पुरवणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)