एक्स्प्लोर
सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर, 38,500 रुपये तोळा, चांदी 44 हजार पार
सोन्याच्या किंमतीत आतापर्यंतची विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचला आहे.

मुंबई : सोन्याच्या किंमतीत आतापर्यंतची विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दरही प्रतिकिलो 44 हजार रुपये इतका वाढला आहे. त्यामुळे सोनं-चांदी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असल्याचे बोललं जात आहे. दिल्ली आणि मुंबईतल्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत आज (गुरवार) 550 ते 600 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर गेला आहे. कालही (बुधवार) सोन्याच्या किंमतीत 1 हजार 113 रुपयांची वाढ झाली होती. अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या ट्रेड वॉरमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढवले आहे. त्याचदरम्यान भारतातल्या गुंतवणूकदारांनीदेखील त्यांचा कल सोन्याकडे वाढवला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























