एक्स्प्लोर

घडलं बिघडलं | 2018 मधील महिला विश्वातल्या घडामोडी

सरत्याला रामराम आणि उगवत्याला प्रणाम करताना 2018 मध्ये फीमेल-ओरिएंटेड काय काय 'घडलं-बिघडलं' याचा घेतलेला आढावा

मुंबई : प्रत्येक वर्षात काही चांगल्या घटना घडतात, तर काही वाईट. सरत्या वर्षात कोणाची स्वप्नपूर्ती झाली, तर कोणाची स्वप्नं भंगली. मात्र महिलांच्या विश्वात या वर्षी कोणकोणत्या घटना घडल्या, हे पाहणं रंजक ठरणार आहे. सरत्याला रामराम आणि उगवत्याला प्रणाम करताना 2018 मध्ये फीमेल-ओरिएंटेड काय काय 'घडलं-बिघडलं' याचा घेतलेला आढावा 1. 2018 मध्ये ज्या मोहिमेची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे #मीटू मोहीम… मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना ‘मी टू मोहिमे’च्या निमित्ताने वाचा फुटत असून या मोहिमेने वादळी रुप धारण केले होतं. या मोहिमेमध्ये अनेक दिग्गज सिनेअभिनेत्री आणि पत्रकार महिलांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. अनेक वर्षे मुस्कटदाबी सहन केलेल्या या स्त्रियांनी अखेर आपले मौन सोडले. 2. या वर्षातील सुप्रीम कोर्टाने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे समलैंगिकता कायद्याला मान्यता. समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. समलैंगिकांनाही मूलभूत हक्क मिळण्याचा अधिकार आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे हे नमूद करण्यात आलं. 3. शनिशिंगणापूर, हाजीअली नंतर महिलांना मंदिरप्रवेशासाठी झगडावे लागले ते केरळमधील शबरीमला मंदिरात. मासिकधर्मामुळे 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेशासाठी मनाई होती, परंतु महिलांनी दिलेल्या लढ्याला महत्व देत सर्वोच्च न्यायालयाने धर्मपरंपरेचा विटाळ संपुष्टात आणत या मंदिरात महिलांसाठी प्रवेश खुला करण्यात आला. 4. या वर्षात देशाबाहेरील महिलांचा बाबतीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यातील एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे आयर्लंडच्या संसदेने गर्भपाताचा कायदा मंजूर केला. 2012 मध्ये वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी भारतीय वंशाच्या सविता हलप्पनवार या महिलेचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी गर्भपाताची परवानगी नाकारल्यानंतर रक्तातील विषबाधेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आणि मोठं आंदोलन येथे करण्यात आलं होतं. 5. सौदी अरबमध्ये दहा महिलांना पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आलं. सौदी अरबच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. सौदी अरबचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत सौदी अरबमधील महिलांवरील ड्रायव्हिंगचा प्रतिबंध हटवण्यात आला आहे. 6. कमी किंमतीत सॅनिटरी पॅडचे उत्पादन करणारे आणि ज्यांच्यावर ‘पॅडमॅन’ चित्रपट आधारित आहे, त्या अरुणाचलम् मुरुगानंदनम् यांनी सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले. या चॅलेंजमध्ये सॅनिटरी पॅडसह फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. तसेच, फोटो शेअर करताना या चॅलेंजसाठी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या व्यक्तींना टॅग करायचं होतं. या चॅलेंजमध्ये अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. 7. 2018 च्या फेब्रुवारी महिन्यात डोळा मारणारी तरुणी देशभरातील लाखो तरुणांच्या ह्रदयाची धडकन झाली. आपल्या नजरेने सगळ्यांना घायाळ केलं प्रिया प्रकाश वारीयरनं. ओरु अदार लव्ह या तमिळ सिनेमातील एका सीनने प्रिया 2018 ची व्हायरल गर्ल ठरली. या सिनेमातील तिचा डोळा मारणारं दृश्य सगळ्यांचंच मन मोहून टाकणारा होतं. 8. 2018 मधील मे आणि जून महिना सोशल मीडियावर जागवला तो चायवाल्या आंटीने. 'हॅलो फ्रेंड्स चाय पिलो' म्हणत हा चाय सगळ्या सोशल मीडियावर डोकेदुखी झाला होता. वेगवेगळे मीम्स आणि कुरापती या चायवाल्या आंटीसोबत झाल्या. पण या चहाची मजा नकळत सगळ्यांनीच घेतली. 9. विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 113 महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश होता. समाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. 10. पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नूयी यांनी क्रिकेट विश्वात पदार्पण केलं. इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेंडन्ट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या. 11. तिहेरी तलाकची कुप्रथा बंद व्हावी यासाठी सरकार विशेष आग्रही दिसलं. मुस्लिम समाजात बहुपत्नीत्व, निकाह आणि हलाला प्रथेची घटनात्मक वैधता तपासण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तिहेरी तलाक बेकायदा ठरवून अशा गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावणारा कायदा लोकसभेत मंजूर झाला. 12. स्त्रीची गुलामगिरी कायम ठेवणारं कलम 497 (व्यभिचार) रद्द करताना बदलत्या काळातल्या वास्तवाशी ते अनुरुप नाही. पत्नी ही वस्तू नव्हे, पतीची खासगी मालमत्ताही नाही. व्यक्ती म्हणून पतीस असलेले अधिकार तिलाही आहेत. तसेच लैंगिक समानतेला अधोरेखित करीत स्त्रीस कमी लेखणाऱ्या कायद्यास घटनेचा तडाखा बसायलाच हवा, हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. 13. भारतीय वंशाच्या तरुणी अन् स्त्रियांनी जगभरात आपली मुद्रा या वर्षांत ठसवली. उदाहरणंच द्यायची तर भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक सीमा नंदा यांची डेमोक्रॅटिक पक्षाच्या (सीईओ) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. 14. आपल्या अतुलनीय धाडसाने ज्यांनी विशेष नावलौकिक मिळवला, अशा काही स्त्रियांचा उल्लेखही करायलाच हवा. ‘मिग 21 बायसन’ हे लढाऊ विमान, ज्या विमानाचा वेग उड्डाण घेताना आणि परतताना सर्वाधिक असतो त्याचे यशस्वीरित्या उड्डाण अन् उतरवून दाखवणारी पहिली भारतीय स्त्री ठरली अवनी चतुर्वेदी. पुण्याच्या श्रुती श्रीखंडेने ‘यूपीएससी’च्या ‘कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला. 15. साहित्य आणि मनोरंजन विश्वातही काही महत्त्त्वाच्या घटना घडल्या. भाषेला वाहती बनवणाऱ्या कवयित्री, संशोधक व लेखिका अरुणा ढेरे यांची ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’च्या अध्यक्षपदी प्रथमच एकमुखाने बिनविरोध निवड झाली, तर राम शेवाळकरांच्या नावाने सुरु झालेला पहिला ‘साहित्यव्रती पुरस्कार’ कथाकार आशा बगे यांना प्राप्त झाला. 16. स्वतंत्र देशातल्या कंजारभाट समाजातल्या ‘तिची’ मात्र आजही लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेतली जाते. ती खरी की खोटी ठरवली जाते, कौमार्य चाचणीच्या विचित्र रुढीच्या विरोधात ‘कंजारभाट’ समाजातील तरुण व तरुणींनी समाजमाध्यमात वाचा फोडली. आणि अभिनव चळवळ सुरू केली. 17. सरत्या वर्षात सायकलवरुन 29 हजार किलोमीटरचे अंतर 159 दिवसांत एकटीने पार करत जगप्रदक्षिणा करणाऱ्या वीस वर्षांच्या वेदांगी कुलकर्णीने नवा विक्राम केला. ऑस्ट्रेलियातून सायकलिंग सुरु केल्यावर न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलँड, स्पेन, फिनलँड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये तिने सायकल चालवली. नवीन प्रदेश, भाषेची अडचण, राहण्या-खाण्यातले वेगळेपण आणि व्हिसा प्रक्रियेची पूर्तता हे सारं तिचं तिनेच सांभाळलं. 18. आपल्या गावरान रेसिपीजनी संपूर्ण जगातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ यूट्यूबर मस्तानअम्मा यांचं वयाच्या 107 व्या वर्षी निधन झालं. आंध्र प्रदेशातील या मस्तानअम्मांचे यूट्यूबवरती सुमारे 12 लाख सबस्कायब्रर होते. शेतामध्ये चूल पेटवून आपल्या लज्जतदार रेसिपीजने जगाला भुरळ घालणाऱ्या मस्तानअम्मा नेहमीच लक्षात राहतील. 19. भारतीय नौदलात कार्यरत असणाऱ्या सहा महिला अधिकारी संपूर्ण जगाची भ्रमंती केल्यानंतर अखेर मायदेशी परतल्या. जवळपास आठ महिन्यांहून जास्त काळ समुद्राच्या मार्गाने संपूर्ण जगाला प्रदक्षिणा या महिला दलानं मारली. विश्वभ्रमंती करुन परतलेल्या या सहा जणींचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं. 20. केंद्रीय लोकसेवा आयोगात यशस्वी कामगिरी बजावली ती प्रांजल पाटील हिनं. आपल्या अंधत्वावर मात करत तिने कमावलेलं हे यश कौतुकास्पद आहे. सध्या प्रांजल सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केरळमधल्या एर्नाकुलममध्ये कार्यरत आहेत. संबंधित फीचर
बाय बाय 2018 : सरत्या वर्षातील आर्थिक जगतातील महत्वाच्या घडामोडी
बाय बाय 2018... ! सरत्या वर्षातील महत्वाच्या राजकीय घडामोडी
2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांचा राहिला दबदबा
घडलं बिघडलं | 2018 मध्ये पुण्यात घडलेल्या 10 घटना
घडलं बिघडलं | 2018 मध्ये घडलेल्या औरंगाबादमधील 10 घटना
घडलं बिघडलं | 2018 मधील मुंबईतल्या 18 घटना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget