(Source: Poll of Polls)
Rahul Gandhi : पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
'पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi on Pm Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. "लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
फटाफट Petrol टैंक फुल करवा लीजिए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 5, 2022
मोदी सरकार का ‘चुनावी’ offer ख़त्म होने जा रहा है। pic.twitter.com/Y8oiFvCJTU
राहुल गांधी यांनी शुक्रवारीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाराणसी येथील पिंडरा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजय राय च्यांच्या प्रचारादरम्यान बोलत असताना राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. शिवाय भाजपचे लोक संपूर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे. परंतु, भाजपचे लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, "मी रामायण आणि महाभारत वाचले आहे. परंतु, त्यामध्ये असे कोठेही लिहिले नाही की, काशीत शिवाच्या दरबारी येऊन खोटे बोला. येथे फक्त धर्माच्या नावावर आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं घेतली जात आहेत. लोकांच्या खात्यात 15 लाख जमा करेन, असे मी कधीच म्हणणार नाही."
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, "मोदीजी म्हणतात की, राहुल गांधी परदेशातील आहेत. परंतु, आम्ही उत्तर प्रदेशचे आहोत. आमचे कुटुंब अलाहाबादचे आहे. मी ऐकले आहे की, मोदीजी मगरीशी लढले होते. परंतु, मोदी स्नान करण्यासाठी गंगेत गेले होते त्यावेळी ते पोहत नव्हते.", अशी मिश्किल टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची अवस्था पाहून राहुल गांधी झाले भावूक, विद्यार्थ्यांसोबत मारहाणीचा व्हिडीओ केला शेअर
- Punjab Election: राहुल गांधी कोणाच्या डोक्यावर ठेवणार 'हात'? पंजाबमध्ये आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार
- Rahul Gandhi Speech: मोदी सरकारचे वाभाडे काढणारे राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे