Punjab Election: राहुल गांधी कोणाच्या डोक्यावर ठेवणार 'हात'? पंजाबमध्ये आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार
आज पंजाबचा काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची घोषणा करणार आहेत.
Punjab Assembly Election 2022 : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, पंजाब काँग्रेससाठी आजचा दिवस मोठा दिवस आहे. कारण आज पंजाबचा काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार आहे. राहुल गांधी हे आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची घोषणा करणार आहेत. राहुल गांधी ही घोषणा लुधीयाना येथे करणार आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार याची सध्या जोरदार राजकीय वर्तुळत चर्चा आहे. दोन नावे सध्या दावेदार मानली जात आहेत. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Chief Minister Charanjit Singh Channi) आणि कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची नावे आघाडीवर आहेत. आता दोघांपैकी राहुल गांधी कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार हे पाहमे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल गांधींच्य निर्णयानंतर काँग्रेसमध्ये नवीन काही हालचाली होणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पंजाब निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर चौफेर हल्ले होत आहेत. अशातच मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचे देखील बोलले जात आहे. हा कलह संपवण्यासाठी काँग्रेसने आम आदमी पक्षासारखा मार्ग स्विकारला आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असेल, हे मतदारांना विचारून ठरवले जाईल. काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदावर जनतेने काय निर्णय घेतला आहे, हे राहुल गांधी आज दुपारी 2 वाजता लुधियानामधून जाहीर करणार आहेत.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आपल्यापेक्षा पुढे जात असल्याचे समजले आहे. त्यामुळे सिद्धू सातत्याने वेगवेगळी विधाने करत काँग्रेस हायकमांडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये चांगलेच राजकीयव वातावरण तापले आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच पंजाब काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे दोघेही आमने-सामने आले आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: