G20 Summit India Guests: जी 20 परिषदेसाठी पाहुण्यांची रेलचेल, कोणते मंत्री कोणत्या राष्ट्राध्यक्षांचं करणार स्वागत?
G20 Summit: दिल्लीच्या प्रगती मैदानावर 9 ते 10 सप्टेंबरदरम्यान जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी ही केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.
![G20 Summit India Guests: जी 20 परिषदेसाठी पाहुण्यांची रेलचेल, कोणते मंत्री कोणत्या राष्ट्राध्यक्षांचं करणार स्वागत? G 20 summit will organized in delhi which minister will welcome which president know detail marathi news G20 Summit India Guests: जी 20 परिषदेसाठी पाहुण्यांची रेलचेल, कोणते मंत्री कोणत्या राष्ट्राध्यक्षांचं करणार स्वागत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/4b767efed884fc4af3e66f2d741202b81694076464875708_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जी - 20 शिखर (G - 20 Summit) परिषदेसाठी राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान या परिषदेसाठी पाहुणे येण्यास देखील सुरुवात झाली आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जग्गनाथ यांच्यासह अनेक पाहुणे गुरुवार (7 सप्टेंबर) रोजी दिल्लीमध्ये पोहचलेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे (8 सप्टेंबर) रोजी भारतात येणार आहेत. तर अनेक देशांच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी ही केंद्रीय मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे.
G-20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र भारत मंडपम येथे होणार आहे. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, युरोपियन युनियनचे उच्च अधिकारी आणि अनेक महत्त्वाचे नेते या परिषदेसाठी भारतात येणार आहेत. दरम्यान कोणत्या केंद्रीय मंत्र्यांकडे कोणत्या पाहुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते जाणून घेऊया.
कोण करणार प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
-
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन - केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह
- इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी - शोभा करंदलाजे, कृषी राज्यमंत्री
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना - दर्शना जरदोश, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
- दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक - अश्विनी चौबे, सार्वजनिक वितरण मंत्री
- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल - राजीव चंद्रशेखर, माहिती तंत्रज्ञान मंत्री
- ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा - नित्यानंद राय, गृहराज्यमंत्री
- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन - अनुप्रिया पटेल, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
- जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ - बीएल वर्मा, केंद्रीय राज्यमंत्री
- मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ - श्रीपाद येसो नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री
- सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग - एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील राज्यमंत्री
- युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेन - प्रल्हाद सिंह पटेल, अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
- स्पेनचे अध्यक्ष - शंतनू ठाकूर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
- चीनचे पंतप्रधान ली कियांग - केंद्रीय मंत्री जनरल व्हि के सिंह
रशिया आणि चीनचे राष्ट्रपती राहणार अनुपस्थित
जी-20 परिषदेसाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे रशियाचे व्लादिमिर पुतिन हे उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाी फोनवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र चीनच्या राष्ट्रपतींनी उपस्थित न राहण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोणत्याही प्रकरचा संवाद साधला नाही. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्यापही समोर आलं नाहीये.
पंतप्रधान मोदी घेणार तयारीचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार (7 सप्टेंबर) रोजी एशियन-इंडिया शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी इंडोनेशियामध्ये पोहचले. दरम्यान ते इंडोनेशियावरुन गुरुवारीच परत भारतात येणार आहेत. जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडणार आहे. ही बैठक सुषमा स्वराज भवनात होणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी हे परिषदेच्या तयारीचा आढावा घेतील.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)