Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर
कोरोना व्हायरसचे चार नवीन रुग्ण आढळले. दिल्ली, जम्मू-काश्मीर, केरळ आणि उत्तर प्रदेशात नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशातील एकूण रुग्णांची संख्या 43 झाली आहे.
नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ आणि जम्मू काश्मीरमध्ये याचे अनेक रूग्ण सापडले आहे. आता कोरोना रूग्णांची संख्या 43 वर गेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही रूग्ण आता परदेशातून भारतात आले आहे. गेल्या 12 तासात नऊ घटना समोर आल्या आहेत. रविवारी (8 मार्च) केरळमधून कोरोनाचे पाच रूग्ण समोर आले. यातील तीन रूग्ण आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी इटलीला गेले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, हरियाणा, लडाख आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रूग्ण समोर आले होते. या 43 रूग्णांपैकी 16 विदेशी नागरिक आहे आणि तीन रूग्ण जे केरळमधून आले होते ज्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहे. ज्यामध्ये देशातील 30 विमानतळावर सर्व पर्यटकांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 7 लाख 74 हजार 708 पर्यटकांची तपासणी केली आहे.
Cultural Program | महाविद्यालयातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम 20 मार्चपर्यंत रद्द
कोरोनामुळे 3600 जणांचा मृत्यू जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख 10 हजारांवर पोहोचली आहे, तर 3 हजार 600 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सर्वाधिक 3119 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्यी 366 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. गेल्या 24 तासात बळींच्या आकड्यात 133 ने वाढला आहे.
इतर देशांतील मृतांचा आकडा
इराण - 194 मृत्यू दक्षिण कोरिया - 50 मृत्यू अमेरिका - 21 मृत्यू फ्रान्स - 19 मृत्यू स्पेन - 10 जपान - 6 मृत्यू
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :
चिकन खाल्याने कोरोना होत नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती
Coronvirus Effect | कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात
Coronavirus Effect | कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता