Covid-19: कोरोनानं धाकधूक वाढवली; अमेरिकेहून पश्चिम बंगालमध्ये परतलेल्या चौघांना BF.7 व्हेरियंटची लागण
West Bengal Covid News: पश्चिम बंगालमध्ये अमेरिकेहून परतलेल्या चौघांना BF.7 सब-व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
West Bengal Covid News: कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (4 जानेवारी) पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसच्या (Covid-19) ओमायक्रॉनचा (Omicron) सब-व्हेरियंट BF.7 च्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्वजण अमेरिकेतून आल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. नुकतंच अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या सर्वांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 (Omicron Sub Variant BF.7) ची लागण झाली असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. अधिकाऱ्यानं सांगितलंय की, चार जणांपैकी तीन जण नादिया जिल्ह्यातील आहेत, तर एक व्यक्ती बिहारचा रहिवाशी आहे, परंतु सध्या तो कोलकात्यात राहतो.
बंगालमध्ये BF.7 च्या दोन रुग्णांची नोंद
गेल्या आठवड्यातही कोलकाता विमानतळावर कोविड-19 चाचणीत एका परदेशी नागरिकासह दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं होतं. त्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगनंतर पुष्टी केली की, त्यांना Omicron च्या BF.7 सब-व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. चीनसह अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 नं खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवण्यात येत असून त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
अमेरिकेतून परतलेल्या तरुणांना यूपीमध्येही संसर्ग
विमानतळावर स्क्रिनिंग आणि कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेत शिकत असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका तरुणाला घरी परतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, अमेरिकेतून आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली, घसा खवखवणं, खोकला आणि ताप आला. त्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, ज्याचा अहवाल मंगळवारी आला आणि त्याला कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्या विद्यार्थ्याला घरीच आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितलं आहे.
WHO नंही दिला इशारा
WHO नंही नव्या वर्षात कोरोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. ग्लोबल प्रेस कॉन्फरन्समध्ये एबीपी न्यूजच्या प्रश्नावर, डब्ल्यूएचओ तज्ञ म्हणाले की, एक नवी लाट येऊ शकते, आता XBB.1.5 प्रकार देखील वेगानं पसरत आहे. प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झालीच पाहिजे असं नाही. त्यांनी चीननं दिलेला डेटा अपुरा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Fact Check: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन? व्हायरल होणारी बातमी कितपत खरी?