Fact Check: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन? व्हायरल होणारी बातमी कितपत खरी?
Fact Check News: अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, लॉकडाऊनची एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं या बातमीची सत्यता तपासली आहे.
Fact Check News: देशासह संपूर्ण जगाची धाकधूक कोरोनानं (Coronavirus) वाढवली आहे. चीन, जपान, अमेरिका, कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारनंही राज्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. चीनसह अनेक देशांतील प्रवाशांसाठी RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवालही अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाबाबत देशात अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात येणार असून पुढील 20 दिवस शाळा/कॉलेज बंद राहणार आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं ही व्हायरल बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडिया पर कई खबरों को शेयर करते हुए दावा किया जा रहा है कि #Covid19 के कारण देश में लॉकडाउन लगेगा और स्कूल/कॉलेज बंद रहेंगे। #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 4, 2023
✅ ये सभी दावे फ़र्ज़ी हैं।
✅ कोविड से जुड़ी ऐसी किसी भी जानकारी को शेयर करने से पहले #FactCheck अवश्य करें। pic.twitter.com/jLcIeI9pBn
लॉकडाऊनबाबत व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या
ट्विटरवर याला उत्तर देताना पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं सांगितलं की, कोविड-19 मुळे देशात लॉकडाऊन लागू केला जाईल आणि शाळा/कॉलेज बंद राहतील, असा दावा करणाऱ्या अनेक बातम्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. हे सर्व दावे खोटे असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. कोविडशी संबंधित अशी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा आणि मगच शेअर करा, असं आवाहनही पीआयबीच्या वतीनं करण्यात आलं आहे.
कोरोनाबाबत सरकार सतर्क
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सांगितलं होतं की, चीन (China), हाँगकाँग (Hong Kong), जपान (Japan), दक्षिण कोरिया (South Korea), सिंगापूर (Singapore) आणि थायलंडमधून (Thailand) भारतातील कोणत्याही विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविडचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य आहे. त्यांनी मुळात कोणत्याही देशातून प्रवास सुरू केला असला तरी त्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं अनिवार्य आहे.
देशातील कोविड परिस्थिती
मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4.46 कोटी (4,46,78,956) नोंदवली गेली आहे. संसर्गामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 5,30,707 आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :