Manmohan Singh Death: दोन वेळा भारताचे पंतप्रधान, तरीही साधी राहणी, डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे किती संपत्ती?
Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दोन वेळा पंतप्रधान होऊन देखील त्यांची राहणी साधी होती.
Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान,त्यांचा मृत्यू झाला आहे. मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे त्यांची नम्रता, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी यासाठी ओळखले जात होते. पंतप्रधानपद सोडल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दुरावले होते. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंह हे दोनवेळा पंतप्रधान होऊन देखील त्यांची राहणी साधी होती.
मनमोहन सिंह यांच्याकडे 15 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे अत्यंत साधे जीवन जगले. त्यांच्याकडे फार मोठी संपत्ती देखील नव्हती. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही 15 कोटी 77 लाख रुपयांची आहे. राज्यसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दिल्ली आणि चंदीगडमध्येही त्यांचा फ्लॅट आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंह यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला होता. 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून घेतले होते. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी सन्मान पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल केले. डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांना तीन मुली आहेत.
डॉ. मनमोहन सिंह यांची राजकीय कारकिर्द
डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे चौदावे पंतप्रधान झाले होते. डॉ. मनमोहन सिंह हे नम्रता, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी यासाठी ओळखले जातात. मनमोहन सिंह 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले होते. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. ते अर्थ मंत्रालयाचे सचिव तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मनमोहन सिंह 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता. ते 2004 साली भारताचे पंतप्रदान झाले. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. ते सलग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान होते.
महत्वाच्या बातम्या: