एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नावावर 58 लाख 99 हजार 232 रुपयांची म्हणजे अंदाजे 59 लाखांची चल-अचल संपत्ती आहे.
![माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती... Former PM Atal Bihari Vajpayee's property माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/17084420/Atal-Bihari-Vajpayee-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आयुष्यभर जोडलेली माणसं, वाचलेली पुस्तकं, रचलेल्या कविता ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची खरी संपत्ती होती, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. राजकारणात जेमतेम पाच वर्ष घालवणारे लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांची माया जमवत असल्याची उदाहरणं एकीकडे आहेत, मात्र तब्बल पाच दशकं राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या महाऋषीने आपल्या पश्चात 59 लाख रुपयांचीच संपत्ती ठेवली आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांनी 2004 मध्ये लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार वाजपेयींच्या नावावर 58 लाख 99 हजार 232 रुपयांची म्हणजे अंदाजे 59 लाखांची चल-अचल संपत्ती आहे.
वाजपेयींची चल संपत्ती (रोख, बँकेतील ठेवी आणि सोनं-चांदी) 30 लाख 99 हजार 232 रुपये इतकी आहे. तर अचल संपत्ती (घर, जमीन इत्यादी) 28 लाख रुपये इतकी आहे. स्टेट बँकेच्या एका खात्यात 20 हजार रुपये, दुसऱ्यामध्ये 3 लाख 82 हजार 886 रुपये, तर तिसऱ्यामध्ये 25 लाख 75 हजार 562 रुपये होते.
वाजपेयी अविवाहित होते. 1998 मध्ये वाजपेयी दिल्लीतील सात रेसकोर्स रोडवर राहायला गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण राजकुमारी कौल, त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य सोबत होते.
वाजपेयींचं मृत्यूपत्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र 2005 च्या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनाच वाजपेयींचं उत्तराधिकारी मानलं जाणार असून वाजपेयींची संपत्ती त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.
'1987 मध्ये मला किडनीच्या आजाराने ग्रासलं होतं. अमेरिकेला जाऊन उपचार घेण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माझी मदत केली.' असं वाजपेयींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
जेव्हा अटलजी पंढरपुरात विठ्ठलदर्शनासाठी आले होते...
सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?
वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया
मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी
मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला
आणखी एक भीष्म पितामह गमावला, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त
अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?
हेमा मालिनीचा 'सीता और गीता' वाजपेयींनी 25 वेळा पाहिला!
जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश
अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी
वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी
राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन
हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)