एक्स्प्लोर
सायकल चोरीप्रकरणी स्वामी ओम यांना अटक
नेहमीच वादात असणारे आणि एकेकाळचे ‘बिग बॉस’ या शोमधील स्पर्धक स्वामी ओम यांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: नेहमीच वादात असणारे आणि एकेकाळचे ‘बिग बॉस’ या शोमधील स्पर्धक स्वामी ओम यांना अटक करण्यात आली आहे.
9 वर्षापूर्वी केलेल्या सायकल चोरीप्रकरणी स्वामी ओम यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे स्वामी ओम यांच्या भावानेच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नऊ वर्षांपूर्वी विनोदानंद झा म्हणजेच स्वामी ओम यांनी आपल्या दुकानातून सायकल आणि काही महत्त्वाची कागदपत्रं चोरली होती, अशी तक्रार त्यांचा भाऊ प्रमोद झा यांनी दिली होती.
यानंतर वर्षभरापूर्वी दिल्लीतील साकेत कोर्टाने स्वामी ओम यांच्यावर आरोप निश्चित झाले होते.
नोव्हेंबर 2008 मध्ये दिल्लीतील एका पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती. स्वामी ओम यांनी तीन साथीदारांच्या सहाय्याने सायकलच्या दुकानाचं कुलूप तोडून, तीन सायकल पळवल्या होत्या. त्यासोबत त्यांनी घराची महत्त्वाची कागदपत्रंही नेली होती, असा आरोप प्रमोद यांनी केला होता.
याप्रकरणी कोर्टाने गेल्या वर्षी स्वामी ओम यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. अखेर त्यांना बुधवारी अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement