एक्स्प्लोर

अयोध्या प्रकरणी 10 जानेवारीपासून सुनावणी, घटनापीठात 3 मराठमोळे न्यायमूर्ती

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वात हे घटनापीठ काम करणार आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामन, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड या मराठमोळ्या न्यायमूर्तींचा समावेश आहे.

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन केलं आहे. या घटनापीठापुढे 10 जानेवारीपासून अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वात हे घटनापीठ काम करणार असून या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामन, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड या मराठमोळ्या न्यायमूर्तींचा  समावेश आहे.

गेल्या 29 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल, असं जाहीर केलं होतं. याप्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी करणारा अर्ज हिंदू महासभेने केला होता. त्यामुळे आता या घटनापीठमार्फत 10 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील सर्वात मोठ्या प्रकरणाचा निकाल मराठी न्यायमूर्तींचं बहुमत असलेलं घटनापीठ देणार आहे.

कोण आहेत हे मराठमोळे न्यायमूर्ती?

न्यायमूर्ती शरद बोबडे

- नागपूरमध्ये 24 एप्रिल 1956 रोजी जन्म - नागपूर विद्यापीठातून बीए एलएलबीची पदवी - 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिलीपासून सुरुवात -  मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती - 2012 मध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती - एप्रिल 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती - 23 एप्रिल 2021 पर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कालावधी

न्यायमूर्ती उदय लळित

- 9 नोव्हेंबर 1957 चा जन्म - जून 1983 पासून वकिलीला सुरुवात - सुरुवातीची काही वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली - 1986 पासून दिल्लीत तर 2004 ला सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कामकाज पाहिलं - 2 जी प्रकरणात सीबीआयकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती - 13 आॉगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती - 8 नोव्हेंबर 2022 ला निवृत्त होणार

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड

- दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रातून बीएची पदवी, त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण - अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएमचं शिक्षण - 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती - त्याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालयात 2013 पर्यंत न्यायाधीश - सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली - देशाचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे पुत्र - आधार, समलैंगिकता यासह गेल्या काळात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये चंद्रचूड यांच्या निकालांची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget