एक्स्प्लोर

दृष्टीहिन IAS अधिकारी प्रांजल पाटील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी

देश की पहली दृष्टिबाधित IAS अधिकारी प्रांजल पाटिल ने संभाली तिरुवनंतपुरम सब कलेक्टर की जिम्मेदारी

थिरुवनंतपुरम : क्लास इज परमनंट...नाणं खणखणीत असलं की ते कुठेही असलं तरी वाजल्याशिवाय राहत नाहीच. असंच घडलंय उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलच्या बाबतीत. देशातील पहिली दृष्टीहिन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटीलने सोमवारी (14 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. महाराष्ट्रातील उल्हासनगरमधील असलेली प्रांजल हे केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणारी पहिली दृष्टीहिन आयएएस अधिकारी ठरली आहे. प्रांजल पाटीलची दृष्टी जन्मापासून कमकुवत होती, पण वयाच्या सातव्या वर्षी तिची दृष्टी पूर्णत: गेली. परंतु ती खचली नाही, आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निश्चय करुन ती वाटचाल करत राहिली. आपल्या पहिल्या प्रयत्नातच प्रांजलने यूपीएससी परीक्षेत 773 वं स्थान मिळवलं होतं. 30 वर्षीय प्रांजलने 2017 मध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत 124वं स्थान मिळवलं. मग प्रशिक्षणानंतर प्रांजलने 2017 मध्ये केरळच्या एर्नाकुलममध्ये असिस्टट कलेक्ट र म्हणून आपल्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. पदवीचं शिक्षण घेताना प्रांजलने पहिल्यांदा यूपीएससीबाबत वाचलं. यानंतर तिने यूपीएससी परीक्षेसंदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच तिने आयएस अधिकारी बनण्याचं निश्चित केलं. बीए केल्यानंतर ती दिल्लीत गेली आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून एमए पूर्ण केलं. "ही जबाबदारी स्वीकारताना मला फार छान वाटत आहे. मी माझ्या कामादरम्यान हा जिल्हा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. जिल्ह्यासाठी चांगल्या योजनाही आणेन," असं प्रांजलने पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं. संबंधित बातम्या अंध प्रांजलचं पुन्हा खणखणीत यश, UPSC मध्ये 124 वी रँक UPSC रँकर प्रांजलला अंधत्वाच्या कारणाने रेल्वे सर्व्हिस नाकारली डोळे उघडणारं यश... मराठमोळ्या प्रांजलीचा यूपीएससीतील संघर्षमय प्रवास रेल्वे अकाऊंट सर्विससाठी ताटकळत 773 व्या क्रमाकांनुसार प्रांजलला रेल्वे अकाऊंट सर्विस देण्यात आली होती. मात्र तिच्या अंधपणाचं कारण सांगत रेल्वेने तिला ताटकळत ठेवलं. प्रांजल पाटीलची व्यथा एबीपी माझाने दाखवल्यानंतर, रेल्वे मंत्रालय खडबडून जागं झालं. प्रांजल पाटील ज्या पदासाठी पात्र झाली होती, त्याच इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिसमध्येच तिला रुजू केलं जाईल, असं तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं होतं. नवी रँक, नवी पोस्ट यानंतर प्रांजलने पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि 124वी रँक मिळवली. अंध असल्याचं कारण दाखवून जी व्यवस्था तिला तिच्या हक्काची पोस्ट देत नव्हती, त्यांच्या नाकावर टिच्चून तिने पुन्हा यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं. या रँकिंगच्याच जोरावर प्रांजल आज उपजिल्हाधिकारी बनली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget