एक्स्प्लोर

Fire Incident In Hospital: देशभरातील हॉस्पिटलमधील आगीच्या दुर्घटनांचा मागोवा

हॉस्पिटलमध्ये आग लागल्याच्या घटना (Fire Incident In Hospital) भारतात या आधीही अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट (electrical short circuit) हेच असल्याचं प्रत्येकवेळी समोर आलंय.

मुंबई: भंडाऱ्यातील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात शिशुंचा मृत्यू झाला. एखाद्या हॉस्पिटलला आग लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यापैकी बहुतांश आगीच्या घटनांचे कारण हे इलेक्ट्रिक शार्ट सर्किट हेच आहे. तसेच यातील बहुतेक घटना या रात्रीच्या वा पहाटेच्या वेळी घडल्याचं दिसून येतंय. भंडाऱ्याच्या या घटनेप्रमाणेच कोलकात्यातील AMRI हॉस्पिटल आगीची दुर्घटनाही आजही लोकांच्या लक्षात आहे.

2018 साली मुंबईतील कामनगर हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेत 176 लोक जखमी झाले होते.

कलकत्ता मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलला ऑक्टोबर 2018 साली अशाच प्रकारची आग लागली होती. यामध्ये 250 लोकांचा जीव वाचवण्यात आला होता. त्या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले की या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनेसंबंधी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. कमी गुणवत्तेच्या इलेक्ट्रीक साधनांचा वापर करण्यात आल्याने शॉर्ट सर्किटची घटना घडल्याचं सांगण्यात आलं होतं.

Bhandara Hospital Fire | 'भंडाऱ्याची घटना दुर्दैवी, रुग्णालयांच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही' : मुख्यमंत्री

ऑक्टोबर 2016 रोजी भूवनेश्वर येथील सुम हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली होती. यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता. आग लागल्यानंतर झालेल्या धुरामुळे गुदमरुन अनेकांचा जीव गेल्याचं अहवालातून स्पष्ट झालं. यातील बहुतांश रुग्ण हे ऑक्सिजनच्या सपोर्टवर होते. या घटनेतील धक्कादायक बाब अशी होती की आग लागल्यानंतर या ठिकाणचे सुरक्षा रक्षक बाहेर पडणाऱ्या रुग्णांना पुन्हा त्या इमारतीमध्ये ढकलत होते. प्रोटोकॉलनुसार रुग्णांना त्या इमारतीमधून बाहेर पडू देण्यास त्यांना वरिष्ठांचा आदेश आला नसल्याचं कारण देत होते.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ऑक्टोबर 2016 साली लागलेल्या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर इतर सात रुग्ण जखमी झाले होते.

ओडिशातील कटकच्या शिशु भवन हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर 2015 साली आग लागली होती. त्यामध्ये एक बालक गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या काहीच दिवसांपूर्वी हे हॉस्पिटल चर्चेत आलं होते. डॉक्टरांच्या दुर्लक्षतेमुळे या हॉस्पिटलमध्ये अनेक नवजात शिशुंचा मृत्यू झाला होता.

Bhandara Hospital Fire | बारसंही नशीबी नाही! SNCUत 17 पैकी 15 मुली, त्यातल्या 8 मुली अन् 2 मुलं दगावली

कोलकात्यातील AMRI हॉस्पिटल आगीची दुर्घटना आजही अनेक लोकांच्या लक्षात आहे. या दुर्दैवी घटनेत 94 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 90 रुग्णांचा समावेश होता. एका अंडरग्राउंड पार्किंगच्या ठिकाणी अवैधपणे मेडिकल साहित्यांची साठवणूक करण्यात आली होती. या साहित्याने पेट घेतली आणि एसी डक्टच्या आधारे ती आग वरच्या मजल्यावरील हॉस्पिटलमध्ये पसरली.

कोरोना काळातील घटना कोरोनाच्या काळातही अनेक हॉस्पिटलमध्ये आगीच्या घटना घडल्याचं पहायला मिळालं. 27 नोव्हेंबर 2020 रोजी गुजरातमधील राजकोट येथील कोरोना आयसोलेशन वार्डला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रकारे अहमदाबाद हृदय कोविड केअर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या लिकेजमुळे आग लागली होती. सुदैवाने यातील सर्व रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले. कोरोनाच्या काळात अशाच प्रकारच्या इतर सहा आगीच्या घटना गुजरातमध्ये घडल्या होत्या. या घटनाही शॉर्ट सर्किटमुळे घडल्या होत्या. सॅनिटायझरच्या साठ्यामुळे ही आग जास्तच भडकायची.

Bhandara Hospital Fire | आज 'तिथे' सविता इखर असत्या तर ..

आंध्र प्रदेशमधील विजयवड्यात कोरोनाच्या काळात एका हॉटेलचे रुपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. रमेश हॉस्पिटल्स या नावाने सुरु करण्यात आलेल्या या कोरोना हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट 2020 रोजी आग लागल्याची घटना घडली. या आगीत दहा रुग्णांचा मृत्यू झाला तर इतर 21 रुग्ण जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच अंनतापूरमधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

कोल्हापूरातील शासकीय हॉस्पिटल सीपीआरमध्ये अशाच प्रकारे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. हॉस्पिटलच्या कोरोना अतिदक्षता वार्डमध्ये लागलेल्या या आगीमध्ये रुग्णाचे शिफ्टिंग करताना तिघांचा मृत्यू झाला होता.

आगीच्या घटना घडलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीत एक गोष्ट समोर आलीय म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे फायर ऑडिट झालेले नव्हते. तसेच त्यांच्या स्टाफलाही या संबंधी प्रशिक्षण देण्यात आले नव्हते.

धक्कादायक! बुलढाणा जिल्हा रुग्णालयासहीत अनेक रुग्णालयाचे फायर ऑडिट कित्तेक वर्षापासून नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget