Bhandara Hospital Fire | बारसंही नशीबी नाही! SNCUत 17 पैकी 15 मुली, त्यातल्या 8 मुली अन् 2 मुलं दगावली
Bhandara Hospital Fire : महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. SNCUतील या 17 बालंकापैकी 15 मुली तर दोन मुलं होती. त्यातल्या 8 मुली दगावल्या असून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
![Bhandara Hospital Fire | बारसंही नशीबी नाही! SNCUत 17 पैकी 15 मुली, त्यातल्या 8 मुली अन् 2 मुलं दगावली Bhandara Hospital Fire Update 15 out of 17 girls, 8 girls and 2 boys Dead Bhandara Hospital Fire | बारसंही नशीबी नाही! SNCUत 17 पैकी 15 मुली, त्यातल्या 8 मुली अन् 2 मुलं दगावली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09215649/WhatsApp-Image-2021-01-09-at-4.17.37-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भंडारा : महाराष्ट्र आणि साऱ्या देशाच्याच काळजात चर्रssss करणारी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळं गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. SNCUतील या 17 बालंकापैकी 15 मुली तर दोन मुलं होती. त्यातल्या 8 मुली दगावल्या असून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही सर्व निरपराध बालकं जन्मापासून दवाखान्यातच होती. यातली काही दोन तर तीन दिवसांची तर काही महिनाभराचं असेल. या लेकरांच्या नशीबी बारसंही आलं नाही.
Bhandara Hospital Fire | आमची लेकरं गेली.... ; मृत बालकांच्या मातांचा आक्रोश
10 बालकं मृत झाली असून त्यांच्या मातांची नावे याप्रमाणे
1 - आईचे नाव - हिरकन्या हिरालाल भानारकर (मृत बालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली),
2 - आईचे नाव - प्रियंका जयंत बसेशंकर (मृत बालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी),
3 - आईचे नाव - योगिता विकेश धुळसे (मृत बालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा)
4- आईचे नाव - सुषमा पंढरी भंडारी (मृत बालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया),
5 - आईचे नाव - गिता विश्वनाथ बेहरे (मृत बालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा),
6 - आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी),
7 - आईचे नाव - सुकेशनी धर्मपाल आगरे (मृत बालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी),
8 - आईचे नाव - कविता बारेलाल कुंभारे (मृत बालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर),
9- आईचे नाव - वंदना मोहन सिडाम (मृत बालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा),
10 - अज्ञात (मृत बालक-पुरुष)
सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले शिशू
1 - आईचे नाव - शामकला शेंडे (बालक-स्त्री),
2 - आईचे नाव - दीक्षा दिनेश खंडाते (बालक - स्त्री (जुळे),
3 - आईचे नाव - अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री),
4 - आईचे नाव - चेतना चाचेरे (बालक-स्त्री),
5 - आईचे नाव - करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री),
6 - आईचे नाव - सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री).
रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं. चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातांची आणि नातेवाईकांची झालेली अवस्था मन हेलावणारी आहे. दरम्यान, अनेक नेतेमंडळी आणि स्थानिक नेतेमंडळींनी या घटनास्थळाचा आढावा घेतला. स्थानिक आमदारांनी घटनास्थळी भेट देत या बेजबाबदारपणासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.
रुग्णालयांच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही: मुख्यमंत्री
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
व्हिडीओ: Bhandara Hospital Fire | 'या' सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले 7 चिमुकल्यांचे प्राण
Bhandara Hospital Fire update : पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत : राजेश टोपे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)