एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुवनेश्वरमध्ये रुग्णालयात आग, 22 जणांचा मृत्यू
भुवनेश्वरः ओडीशाची राजधानी भुवनेश्वरमधल्या सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. श्वास गुदमरुन जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एसयूएम या रुग्णालयात ही घटना घडली. अगोदर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर काही क्षणात ही आग सगळीकडे पसरली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेने मात्र मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.
अग्निशमन विभागाच्या 24 गाड्यांनी कठिण परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. शिवाय रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement