एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

संजय राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, नवनीत राणा यांचं दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र

खासदार नवनीत राणा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. "संजय राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. "मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत. ते एससी-एसटीमध्ये येत नाहीत. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा," असं नवनीत राणा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसंच 420 म्हणत संजय राऊत यांनी माझी बदनामी केली, असं राणा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "मी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पराभूत करुन अमरावती मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासूनच शिवसेनेचे नेते संजय राऊत माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत. मी केवळ मागासवर्गीय असल्याने, चांभार जातीची आहे, त्यामुळे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माझा आणि माझ्या पतीचा उल्लेख बंटी आणि बबली असा केला. समाजात माझी बदनामी करण्याच्या इराद्याने मला 420 म्हटलं."


संजय राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, नवनीत राणा यांचं दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, "मी खारमधल्या माझ्या घरात असताना संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या घरी पाठवून घेरण्यासाठी प्रवृत्त केलं. तसंच मला जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अॅम्ब्युलन्सही आणली होती. असं करताना संजय राऊत यांनी एका मागासवर्गीय महिलेला घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं. जर घराबाहेर पडले तर जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाही संजय राऊतांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मला आणि माझ्या पतीला जमिनीत गाडण्याची धमकी दिली."

"संजय राऊतांनी एका मागासवर्गीय महिलेला शिवीगाळ केली. संजय राऊतांमुळे एका शिवसैनिकाने वृत्तवाहिनीवर मला चोर म्हणून संबोधलं, कारण मी चांभार जातीतून आहे," असं राणा यांनी पत्रात लिहिलं आहे.


संजय राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, नवनीत राणा यांचं दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र

"मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत. ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये येत नाहीत. संजय राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (अॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल करायला हवा. यासाठी मी तुमच्यासमोर माझी लेखी तक्रार देत आहे," असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget