एक्स्प्लोर

Farmers Protest : ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आज स्थगित होणार? 'या' मुद्यांवर झाली सहमती

Farmers Protest : तीन कृषी कायदे व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.

Farmers Protest :  वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये काही मुद्यांवर सहमती झाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने याबाबत बुधवारी रात्री संकेत दिले. दीर्घकाळ सुरू असलेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारच्या मसुद्यावर एकमत झाले आहे. आता, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. नवीन मसुद्यावर सरकारकडून औपचारिकपणे सहमती मिळाल्याचे समजताच आंदोलन स्थगित करण्याची घोषणा होऊ शकते. 

शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार

शेतकरी नेते आणि एसकेएम कोअर कमिटीचे सदस्य गुरनाम सिंह यांनी सांगितले की, प्रलंबित मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा मसुदा मान्य नव्हता, त्यानंतर केंद्राने बुधवारी प्रस्तावाचा नवा मसुदा पाठवला आहे. एसकेएमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठवलेल्या नवीन प्रस्तावात हे स्पष्ट करण्यात आले आहे की किमान आधारभूत किंमत (एमएसपी) समितीमध्ये एसकेएमच्या सदस्यांचा समावेश असेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा सरकारने शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे. दिल्लीतील गुन्हेही मागे घेतले जाणार आहे. आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाची (एसकेएम) गुरुवारी दुपारी १२ वाजता दुसरी बैठक होणार आहे. सिंघू सीमेवर होणाऱ्या बैठकीत आंदोलन स्थगित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

वीज विधेयकाचे काय?

वीज कायदा सुधारणा विधेयकातील शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या नियमांबाबत संयुक्त किसान मोर्चासोबत चर्चा करण्यात येईल. त्याआधी हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार नसल्याची ग्वाही केंद्राकडून देण्यात आल्याची माहिती आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget