Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Supriya Sule Vinod Tawde Meet: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक लक्षवेधी घटना घडली आहे.

Supriya Sule Vinod Tawde Meet: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP Sharad Pawar) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक लक्षवेधी घटना घडली आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन इथं जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असताना अचानक सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) हे दोन्ही खासदार चालू बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर दोघेही एकाच कारमधून निघून गेले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सुप्रिया सुळेंचा प्रभाव असतो. तर राष्ट्रीय सरचिटणीस असल्यामुळे भाजपच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये विनोद तावडे सहभागी असतात. याच कारणामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे केवळ एका बैठकीला जात होते- अमोल कोल्हे (Supriya Sule Vinod Tawde Meet)
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे केवळ एका बैठकीला जात होते, त्यात राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. तर दोघांची स्टँडिंग कमिटीची मिटींग असल्यानं ते एकत्रित गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली. दरम्यान जलजीवन मिशनच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. जलजीवन मिशनचा खर्च केंद्र आणि राज्यानं 50 टक्के उचलायला हवा अशी मागणी यावेळी समोर आली. याच मागणीवरुन राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. पुढच्या आठवड्यात संसदेत डिलीमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षातील नेते आणि भाजपच्या नेत्यांची भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक- (NCP Sharad Pawar Politics)
दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील सर्व खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीच्या काळात संसदेत झालेली पवार मोदी भेट, त्यानंतर पवारांच्या खासदारांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट आणि त्यानंतर रेवती सुळेंच्या रिसेप्शनला स्वतः पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांची उपस्थिती...या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या घरी झालेल्या या बैठकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं.
भाजप नेते विनोद तावडे आणि सुप्रिया सुळेंचा एकाच गाडीतून प्रवास, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?






















