एक्स्प्लोर

Farmers Protest | दिल्लीत कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; अन्नदात्यांचं आज 'उपोषण'

आज शेतकऱ्यांचा आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस असून गेल्या 18 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. अशातच आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत.

नवी दिल्ली : गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणं आंदोलनही केलं जाणार आहे.

शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण 14 डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा आहे. चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत.

चढूनी म्हणाले की, "काही संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, ते सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. आम्ही स्पष्ट करतो की, ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचे सरकारसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आमचं आंदोलन कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचलं आहे. सरकार शेतकऱ्यांचं हे आंदोलन संपवण्याचा कट रचत आहे."

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही करणार उपोषण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे की, ते शतकऱ्यांसोबत सोमवारी एक दिवसाचा उपवास ठेवणार आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थकांना एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबतच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले की, "काही केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते म्हणत आहेत की, शेतकरी आंदोलन राष्ट्राच्या विरोधी आगे. अनेक माजी सैनिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, गायक, दिग्गज, डॉक्टर, व्यापारी शेतकऱ्यांचं समर्थन करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, मग हे सर्व लोक देशद्रोही आहेत का? शेतकरी नेते शिवकुमार कक्का म्हणाले की, "सरकारी एजेन्सी शेतकर्यांना दिल्ली पोहोचण्यापासून रोखत आहे. परंतु, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहेत. आमचा हेतू स्पष्ट आहे. आमची मागणी आहे की, तिनही कृषी कायदे रद्द करावे. या आंदोलनात सहभागी असलेले सर्व शेतकरी संघटना एकत्र आहेत."

शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "जर सरकार चर्चा करण्यासाठी आणखी एकदा प्रस्ताव पाठवणार असेल, तर आमची कमेटी यावर नक्की विचार करेल. आम्ही सर्वांना आंदोलन करताना शांती राखण्याचं आवाहन करतो."

शेतकरी नेते संदीप गिड्डी म्हणाले की, "19 डिसेंबरपासून शेतकऱ्यांचं अनिश्चित काळासाठी केलं जाणारं उपोषण रद्द करण्यात आलं आहे. त्याऐवजी सर्व शेतकरी सोमवारी दिवसभर उपोषणाला बसणार आहेत."

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Embed widget