(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhir Suri : शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, कुटुंबियांची मागणी
Sudhir Suri : पंजाबमध्ये शुक्रवारी एका शिवसेना नेत्याच्या हत्येनं राजकीय वातावरण तापलं आहे. दिवसाढवळ्या गर्दीमधील एका व्यक्तीनं सुधीर सुरी (Sudhir Suri) यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
Sudhir Suri : पंजाबमध्ये शुक्रवारी एका शिवसेना नेत्याच्या हत्येनं राजकीय वातावरण तापलं आहे. दिवसाढवळ्या गर्दीमधील एका व्यक्तीनं सुधीर सुरी (Sudhir Suri) यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये सुधीर सुरी यांचा मृत्यू झाला. सुधीर सुरी यांच्या मृत्यूनंतर अमृतसरमधील वातावरण तापलं आहे. येथील हिंदू संघटनांनी पंजाब बंदचे आवाहन केले होते. पंजाबमधील जालंधर , गुरदासपुर , बरनाला , पटियाला , लुधियाना येथे या बंदला सरासरी प्रतिसाद मिळाला. कडेकोट बंदोबस्तात पंजाब पोलिसांनी आज सुधीर सुरी यांचं पोस्टमार्टम केले.
सुधीर सुरी यांची हत्या झाल्यानंतर पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. सुधीर सुरी यांच्या कुटुंबियांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच तीन मागण्याही केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची मागणी या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा केंद्रीय तपास यंत्रणाकडे द्यावा असी मागणी केली आहे. त्याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. सुधीर सुरी यांना शहीद दर्जा देण्यात यावा, अशा तीन मागण्या सुधीर सुरी यांच्या कुटुंबियांनी केल्या आहेत. अमृतपाल याचं नाव गुन्ह्यात दाखल करण्यात यावं, अशी आणखी एक मागणी सुरी यांच्या कुटुबानं केली आहे.
शनिवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुधीर सुरी यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला. सुधीर सुरी यांच्या घरी आज दिवसभरात अनेक हिंदू संघटनांनी उपस्थिती लावली. त्यासोबतच पोलीस अधिकारीही उपस्थित होते. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत सुरी यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला होता. दरम्यान, येथील अनेक हिंदू संघटनांनी आज पंजाब बंदचे आवाहन केले होते. पंजाबमधील जालंधर, गुरदासपुर, बरनाला, पटियाला, लुधियाना येथे बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. अमृतसरमधील रस्त्यावर मात्र लोकांची गर्दी जमली होती. हिंदू संघटनांनी बंद पुकारला होता. अमृतसरमधील दुकानं, बाजार बंद होते.
सुरी कुटुंबाच्या मागण्या पोलिसांनी मान्य न केल्यामुळे कुटुंबियांनी आणि समर्थकांनी शिवाला रोड येथे आंदोलन केले. अनेक वेळ आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. सुरी कुटुंबियांनी आंदोलन मागे घेतले आहेत. सहा नोव्हेंबर रोजी सुधीर सुरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुधीर सुरी अमृतसरमधील मजीठा रोडवरील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. सुरी यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्यांची प्राणज्योत माळवली आहे. सुधीर सुरी यांच्या मृत्यूनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपीकडून बंदूक जप्त केली.
आणखी वाचा :
Amritsar: अमृतसरमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या शिवसेना नेते सुधीर सूरी यांचा मृत्यू, आरोपी अटकेत