एक्स्प्लोर

Amritsar: अमृतसरमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या शिवसेना नेते सुधीर सूरी यांचा मृत्यू, आरोपी अटकेत

Sudhir Suri Shot Dead : सुधीर सुरी अमृतसरमधील मजीठा रोडवरील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला.

Sudhir Suri Shot Dead : अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सुधीर सुरी अमृतसरमधील मजीठा रोडवरील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. सुरी यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्यांची प्राणज्योत माळवली आहे. सुधीर सुरी यांच्या मृत्यूनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपीकडून बंदूक जप्त केली आहे.  

याप्रकरणी बोलताना पोलिस आयुक्त म्हणाले की,  'सुधीर सूरी गोपाळ मंदिराच्या परिसरात निदर्शन करत होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपीला अटक केलं असून त्याच्याकडून बंदूक जप्त केले.' या प्रकरणी पोलीस महासंकलाक गौरव यादव यांनीही माहिती दिली. ते म्हणाले की, सुधीर सुरी यांना गोळी मारणारा संदीप सिंह याला घटनास्थळावरुन अटक केलं आहे. चौकशीमध्ये अनेक घटनेचा उलगडा होईल. पंजाबमधील जनतेला शांततेचं आवाहन करतोय. सोशल मीडियावरील अफवाकडे लक्ष देऊ नका. 

सुधीर सुरी हे अमृतसरमध्ये एका मंदिराच्या बाहेर निदर्शने करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील आणखी एक शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्यावरही गुरुवारी प्राणघातक हल्ला झाला होता. अश्वनी चोप्रा यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर सायकलवरुन आल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता. पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती. या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Embed widget