एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2004 ते 2016, यापूर्वी चुकीचे ठरलेले एक्झिट पोल
निकालापूर्वी समोर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी हा अंदाज नाकारला आहे.
नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ता कुणाची याचा निर्णय 18 डिसेंबरला होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी हा अंदाज नाकारला आहे.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसचं समर्थन करणारा पाटीदार नेता हार्दिक पटेलनेही एक्झिट पोलवर अविश्वास दाखवला आहे. शिवाय भाजप ईव्हीएममध्ये छेडछाड करणार असल्याचा आरोप केला आहे.
यापूर्वीचे एक्झिट पोल
- 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत होतं, मात्र अंतिम निकाल वेगळाच लागला
- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसत होतं, मात्र प्रत्यक्षात बहुमताने काँग्रेसने सत्ता स्थापन केली
- 2007 सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावती यांचा विजय एकाही एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला नव्हता, मात्र बसपाची सत्ता आली
- 2015 मध्ये आपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज एकाही एक्झिट पोलमध्ये दिसला नव्हता
- 2016 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेस युतीला आघाडी दाखवली होती, मात्र एआयएडीएमके पक्ष सत्तेत आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement