EPFO | डिसेंबरच्या अखेरपर्यंत EPF वर मिळणार 8.50 टक्के व्याज, 6 कोटी लोकांना फायदा
केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्रालयाने 2019-20 सालासाठी EPF मध्ये 8.50 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिला आहे. सीबीटीच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीत 2019-20 सालासाठी EPF वर 8.50 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता.
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF ने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जवळपास 6 कोटी लोकांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात डिसेंबरच्या अखेरपर्यंत एक रक्कमी 8.50 टक्के व्याज जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी सप्टेंबर मध्ये केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री संतोष गंरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत EPF ने 8.15 टक्के आणि 0.35 टक्के अशा दोन भागात व्याज देण्याचा निर्णय घेतला होता.
कामगार मंत्रालयाने दिला प्रस्ताव कामगार मंत्रालयाने 2019-20 या वर्षासाठी EPF मध्ये एक रक्कमी 8.50 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाला दिला आहे. हा प्रस्ताव डिसेंबर महिन्यात पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी काहीच दिवसात मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच महिन्याचा अखेर पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मार्चमध्ये झालेल्या बैठकीत मंजुरी या आधी अर्थमंत्रालयाने गेल्या वर्षीच्या व्याजासंदर्भात कामगार मंत्रालयाकडं स्पष्टीकरण मागवलं होतं. कामगार मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाला त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कामगार मंत्री संतोष गंरवार यांच्या अध्यक्षतेखाली मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत EPF वर 8.50 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या: