एक्स्प्लोर

EPF Withdrawal | कोरोना काळात पीएफचा आधार! खातेदारांनी जवळपास 40 हजार कोटी रुपये काढले!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान अनेकांचे उद्योगधंदे बंद होते. तर अनेकांच्या हातातील कामंही गेलं होतं. अशातच कोरोनाकाळात पीएफ काढण्याची मुभा सरकारने दिली होती.

नवी दिल्ली : कोरोना महामारी दरम्यान, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रॉविडंट फंड (PF) म्हणजेच, भविष्य निर्वाह निधीतून जवळपास 40 हजार कोटी रुपये काढले आहेत. श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाकाळात पीएफ काढण्याची मुभा सरकारने दिली होती. अशातच भविष्य निर्वाह निधीतून सर्वाधिक 7 हजार 838 कोटी महाराष्ट्रातून काढण्यात आले आहेत.

सरकारकडून कोरोना काळात पीएफ काढण्याची मुभा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान अनेकांचे उद्योगधंदे बंद होते. तर अनेकांच्या हातातील कामंही गेलं होतं. त्यावेळी कोरोना काळात ईपीएफओ (एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन) मधून 39 हजार 403 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. यामागील कारण म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना पीएफमधून पैसे काढण्याची मुभा देण्यात आली होती. त्याचाच फायदा लोकांनी घेतला आहे. पीएफमधून पैसे काढण्याचा हा आकडा 25 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे.

सर्वाधिक महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी पीएफमधून पैसे काढले

भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7838 कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले आहेत. पीएफमधून पैसे काढण्यात महाराष्ट्रानंतर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पीएफवर सरकारची योजना

तीन महिन्याचं वेतन आणि डीएच्या बरोबरीची रक्कम किंवा पीएफ खात्यामध्ये जमा झालेली एकूण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी

महत्त्वाच्या बातम्या

Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Gold Silver Rate Today: सकाळच्या सत्रात 9500 रुपयांनी घसरली चांदी, सोन्यातही घसरण; जाणून घ्या आजचे दर अन् घसरणीची कारणं
सकाळच्या सत्रात 9500 रुपयांनी घसरली चांदी, सोन्यातही घसरण; जाणून घ्या आजचे दर अन् घसरणीची कारणं
Adani Energy Satara Tarali Project: वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget