एक्स्प्लोर

समुद्रात जाणारं प्लास्टिक रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठा उपक्रम, 70 हजार मेट्रिक टन प्लास्टिकचं संकलन

समुद्रात जाणारे प्लास्टिक समुद्राकडून रिसायकलिंग केंद्रांकडे वळवले गेले पाहिजे. Recykal प्लास्टिकच्या कचऱ्याकडे  एक स्रोत म्हणून पाहिले पाहिजे.

Plastic in ocean: आपल्या समुद्रांमध्ये (ocean) आणि समुद्रकिनाऱ्यांवर साचणारे प्लास्टिक (plastic) ही जागतिक पातळीवर निर्माण झालेली एक गंभीर समस्या आहे. समुद्रात जाणारे प्लास्टिक समुद्राबाहेरच निर्माण होते. ते समुद्रात जाऊ नये, यासाठी करायची उपाययोजनाही समुद्राबाहेरच आहे, अशी शाश्वतता आणि सर्क्युलॅरिटीमधील भारतीय टेक लीडर Recykal यांची धारणा आहे. समुद्रात जाणारे प्लास्टिक समुद्राकडून रिसायकलिंग केंद्रांकडे वळवले गेले पाहिजे. Recykal प्लास्टिकच्या कचऱ्याकडे  एक स्रोत म्हणून पाहिले पाहिजे. म्हणून Recyckalने, ‘समुद्रमंथन’ या त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रातील प्लास्टिकच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी एक उपक्रम राबवला आहे. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'समुद्रमंथन' उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन करण्यात आलं आहे. राज्यातील मुंबई शहर, पुणे, ठाणे, पालघर, औरंगाबाद, रायगड, धुळे, नागपूर, अकोला नाशिक, नांदेड, चंद्रपूर, अहमदनगर, लातूर या जिल्ह्यात प्लास्टिकचे संकलन करण्यात आलं आहे. या शहरांमधून  6914.674 मेट्रीक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आलं आहे. 

किनारपट्टीवरील सर्व 66 जिल्ह्यांमध्ये उपक्रम राबवणार 

‘समुद्रमंथन’ या भारतीय पौराणिक कथेपासून हा उपक्रम प्रेरित आहे. या कथेनुसार समुद्रमंथनातून अमृत प्राप्त झाले होते. या उपक्रमाअंतर्गत Recykal ने भारतातील 19 राज्यांमधील 207 जिल्ह्यांमधून 70 हजार मेट्रिक टनहून अधिक प्लास्टिक संकलित केले आहे. यापैकी 33 जिल्हे समुद्रकिनाऱ्यावरील भागात आहेत आणि 173 जिल्हे प्रमुख नद्यांच्या किनाऱ्यावर आहेत. समुद्र आणि नद्यांच्या 10 किमीच्या त्रिज्येच्या परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाच्या औचित्याने Recykal ने ‘समुद्रमंथन’ हा प्रकल्प भारतातील समुद्रकिनारपट्टीवरील सर्वच्या सर्व 66 जिल्ह्यांमध्ये राबविण्याची योजना जाहीर केली

समुद्रातील प्लास्टिकचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात

समुद्रात जाणाऱ्या प्लास्टिक हे हानीकारक आहे. जेव्हा प्लास्टिक कचरा समुद्रात जातो तेव्हा त्याचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. त्यामुळं समुद्री जीवनाला, परिसंस्थेला आणि मानवाच्या हिताला धोका पोहोचतो. प्लास्टिकच्या मलब्यामध्ये अनेक घातक घटक असतात. हा मलबा आजुबाजूच्या पाण्यातील विषारी रसायने शोषून घेतो आणि ती साठवून ठेवतो. त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीमध्ये या कचऱ्याचे जैवसंजयन (जीवांच्या शरीरात साठून राहणे) होते. समुद्रजन्य खाद्य (मासे इत्यादी) आहार असलेल्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या समुदायाला, विशेषतः पर्यटन व मासेमारीवर अवलंबून असलेल्या समुदायांवर याचा नकारात्मक परिणाम होतो. कारण त्यांच्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि समुद्री अधिवासांवर प्लास्टिकचा मलबा जमा होत राहतो.

समुद्रमंथन' उपक्रमाच्या माध्यमातून समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाशी लढा 

Recykalच्या 'समुद्रमंथन' उपक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत कार्यपद्धतींची सांगड घालण्यात आली आहे. या माध्यमातून समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाशी लढा देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून Recykal स्थानिक कचरावेचकांना भारतभरातील रिसायकलर्सच्या नेटवर्कशी जोडून त्यांचे सक्षमीकरण करत आहेत. यामुळं कचरावेचकांना आर्थिक सुरक्षा लाभते.  त्याचबरोबर Recykal तर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिक कचरा या अतिरिक्त प्रकाराची भर घालून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांना सक्षम करते. परिणामी, त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सिंगल युझ प्लास्टिक कमी वापरणे, सुधारित घनकचरा व्यवस्थापन, रिसायकलिंग पद्धती, जागरुकता कार्यक्रमाच्या माध्यमातून Recykal तर्फे प्लास्टिक वापराचा प्रतिबंध व घट करण्यावर भर देण्यात येतो. या उपक्रमात समुद्री जैवविविधतेचे जतन करण्यासाठी व किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या समुदायांना लाभ व्हावा यासाठी कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी व सहयोग यावर या उपक्रमामध्ये प्रयत्न करण्यात येतो. 

संकलित केलेल्या प्लास्टिकचे सुयोग्य व्यवस्थापन 

'समुद्रमंथन' उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन करून झाल्यानंतर रिसायकलिंगची प्रक्रिया सुरू होते. संकलित केलेल्या प्लास्टिकचे सुयोग्य व्यवस्थापन करून ते रिसायकलिंगसाठी पाठविण्यात येते. रिसायकलिंग करून प्लास्टिकचे नव्या उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यात येते. त्यामुळे नव्या प्लास्टिकची मागणी कमी होते आणि सर्क्युलर इकोनॉमीचा प्रसार होतो.

सागरी परिसंस्थेत नैसर्गिक संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे ध्येय

Recykal चे सहसंस्थापक व सीओओ अभिषेक देशपांडे म्हणाले की, "पर्यावरणातून प्लास्टिकचा कचरा काढून टाकणे, एवढाच या उपक्रमाचा मर्यादित हेतू नाही. प्लास्टिकच्या प्रदूषणामुळं होणाऱ्या नुकसानाला प्रतिबंध करुन सागरी परिसंस्थेत नैसर्गिक संतुलन पुन्हा निर्माण करणे आणि ते जतन करणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे. समुद्राकडे जाणारे प्लास्टिक संकलित करून समुद्री पर्यावरणाची एकात्मिकता पुनःस्थापित करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि निरोगी समुद्रावर अवलंबून असलेले प्राणी व मानव यांचे हित साधणे हे Recykal चे उद्दिष्ट आहे. या उपक्रमासह आम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाचा नकारात्मक परिणाम कमी करून निसर्गसंवर्धनात योगदान देत आहोत. तसेच भविष्यातील पिढीसाठी अधिक शाश्वत भविष्य उभारत आहोत. समुद्राकडे जाणाऱ्या प्लास्टिकचे संकलन करून सामाजिक आर्थिक विकासातही, विशेषतः किनारपट्टीवरील समुदायांच्या सामाजिक आर्थिक विकासात योगदान देण्यात आले आहे. या उपक्रमामुळं कचरा व्यवस्थापन, क्लीन अप ऑपरेशन्स, रिसायकलिंग सुविधा व संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती झाली आहे. किनारपट्टीच्या भागांचे कल्याण आणि समृद्धी यासाठी योगदान देण्यात आले आहे.

Recykal बद्दल

Recykal ही क्लीनटेक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय भारतातील हैदराबाद येथे आहे. ही कंपनी भारतात सर्क्युलर इकोनॉमी अधिकृत करण्यासाठी काम करत असून भारतात सर्क्युलर इकोनॉमीसाठी मॅनेज्ड मार्केटप्लेसचे उद्गाती आहे. या अंतर्गत कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंग क्षेत्रातील सर्व भागधारकांना डिजिटाइझ्ड कचरा व्यवस्थापन परिसंस्थेसाठी सक्षम करण्यात येत आहे. ही कंपनी प्लास्टिक, कागद, धातू, ई-वेस्ट, टायर व बॅटरी या कॅटेगरींमध्ये सर्क्युलॅरिटी व सस्टेनेबिलिटी सोल्यूशन्स पुरवते. Recykal ही कंपनी कचरा व्यवस्थापन परिसंस्था क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच तंत्रज्ञनावर आधारित पुरवठादार आहे. उत्पादक, कचरा निर्माण करणारे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे आणि भारतातील कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील विविध भागधारक यांच्यात दुवा म्हणून ही कंपनी काम करते.

आतापर्यंत 7,00,000 मेट्रिक टन कचऱ्याचे यशस्वी मार्गीकरण

Recykal कडून उद्योगक्षेत्रातील एका मोठ्या समस्येचे निराकरण करण्यात येते. Recykal ने आतापर्यंत 7,00,000 मेट्रिक टन कचऱ्याचे यशस्वी मार्गीकरण केले आहे. परिणामकारक कचरा व्यवस्थापनाचा प्रसार केला आहे. आज, 400+ ब्रँड्स, 325+ रिसायकलर्स व को-प्रोसेसर्स, 10,000+ बिझनेस, 600+ नागरी स्थानिक संस्था, 3000+ सेवा पुरवठादार आणि ॲग्रिगेटर्स या कंपनीशी जोडलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Latur News: धक्कादायक! मांजरा नदीपात्रात चार एकरमधील खड्डे प्लास्टिकच्या कचऱ्यांना भरले, ग्रामस्थ आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget