Encounter In Kulgam : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद; लष्कराची शोध मोहीम सुरूच
Encounter In Kulgam : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात ही चकमक झाली.
Encounter In Kulgam : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा जवान शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये कुलगाम पोलिसांचाही सहभाग होता.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात ही चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले की, चकमकीत तीन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून 4 वर्ष पूर्ण झाली
आज जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी दहशतवाद्यांबरोबर जवानांची चकमक होत आहे. यावेळी भाजपने श्रीनगरमध्ये विजयी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. सकाळी 9.30 वाजता नेहरू पार्क येथून निघणारी ही विजयी पदयात्रा शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरपर्यंत जाईल. त्याचवेळी खबरदारी म्हणून आज (5 ऑगस्ट) होणारी अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.
बेपत्ता लष्करी जवान
भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानी 29 जुलै रोजी कुलगाम येथून बेपत्ता झाले होते. वानी 29 जुलै रोजी रजेवर घरी आले होते आणि त्याच दिवशी सायंकाळी बेपत्ता झाले होते. जवान ज्या कारमधून घरातून निघाले होते ती कार रस्त्याच्या कडेला सापडली. त्यात रक्ताचेही काही अंश आढळून आले. त्याचवेळी त्यांचे अपहरण झाल्याचा दावा जवानाच्या नातेवाईकांनी केला होता.
बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली होती. 5 दिवसांनंतर 3 ऑगस्ट रोजी वानी पोलिसांच्या पथकाला सापडले. जवानाच्या प्रकृतीबाबत माहिती देताना एडीजीपी काश्मीर यांनी वैद्यकीय तपासणीनंतर त्याची चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. या चौकशीत लष्कर आणि पोलीस या दोन्ही विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ही चकमक सुरू झाली
कुलगाम जिल्ह्यात, शुक्रवारी संध्याकाळी 6.39 वाजता, काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाल्याची माहिती दिली. कुलगामच्या उंच पर्वतावरील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. घटनास्थळी लष्कर आणि कुलगाम पोलिसांची तुकडी तैनात आहे. सुमारे 20 मिनिटांनंतर त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये भारतीय लष्कराच्या 3 जवानांच्या जखमी झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, कुलगाम एन्काउंटर गोळीबारात भारतीय लष्कराचे 3 जवान जखमी झाले आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या शोधात परिसरात शोध घेतला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :