एक्स्प्लोर

Assembly By Election Result: 'आप'साठी आनंदाची बातमी, गुजरात, लुधियानातील पोटनिवडणुकीत मोठं यश, अरविंद केजरीवालांचा मार्ग मोकळा?

AAP : गुजरात आणि पंजाबमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठं यश मिळालं आहे. गुजरातमधील एक जागा आपनं जिंकली आहे.

नवी दिल्ली : पंजाब, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल या चार राज्यातील विधानसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. या पोटनिवडणुकीत आतापर्यंतच्या अपडेटनुसार गुजरातमधील दोन पैकी एका जागेवर भाजपनं आणि एका जागेवर आपनं विजय मिळवला आहे. केरळमधील जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. आम आदमी पार्टीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची जागा असलेल्या पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील आपचा उमेदवार आघाडीवर असून त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. आपला गुजरातमधील विसावदार जागेवर विजय मिळाला आहे. तर लुधियाना पश्चिममधील संजय अरोरा यांचा विजय निश्चित मानला जातोय. आपचे उमेदवार संजय अरोरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. ते विधानसभेत आमदार झाल्यास त्यांच्या जागी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

पश्चिम लुधियानात आप आघाडीवर

पश्चिम लुधियानात आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली. पश्चिम लुधियानातील या तिरंगी लढतीत आपचे उमेदवार संजीव अरोरा यांनी 14 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर 35719 मतं मिळवली आहेत. तर, काँग्रेसच्या भारत अशू यांना 24542 मतं मिळालीत. भाजपच्या जीवन गुप्ता यांना 20323 मतं मिळाली आहेत. या जागेवरुन आपचा विजय निश्चित आहे. 

पश्चि लुधियानातील आपचे उमेदवार संजीव अरोरा हे राज्यसभा खासदार आहेत. ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. अरोरांच्या रिक्त होणाऱ्या जागेवरुन आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल राज्यसभेचे सदस्य होतील, अशा चर्चा आहेत. अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 

भाजपनं गुजरातच्या कडी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पाच पैकी या एका जागेवर भाजपला यश मिळालं आहे. भाजपचे राजेंद्रकुमार छावडा हे या जागेवर विजयी झाले.

केरळमधील निलाम्बूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि माकप यांच्यात लढत होती. या ठिकाणची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसचे आर्यदन शौकत हे 11077 मतांनी आघाडीवर आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी कालिगंज विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत टीएमसीच्या आलिफा अहमद यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या ठिकाणी देखील तिरंगी लढत झाली. मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेत टीएमसीच्या अलिफा अहमद यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अलिफा अहमद  17 व्या फेरीअखेर 48 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
Laxman Hake :  2029 निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ..हाकेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
AI VS JOB : AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? कोण सुरक्षित?
Yawatmal : उर्दू शाळेत गायलं पाकिस्तानी गीत,विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गीतावर नृत्य केल्याचा आरोप
Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
Embed widget