एक्स्प्लोर

Election 2021 Dates : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक; पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार?

तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी, पश्चिम बंगालचा कार्यकाळ 30 मे रोजी, आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी संपुष्टात येत आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक पार पडणार आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडणार आहेत. याआधी कोरोना काळात बिहार विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी, पश्चिम बंगालचा कार्यकाळ 30 मे रोजी, आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी संपुष्टात येत आहे. तर केरळ विधानसभेचा कार्यकाळ 1 जून रोजी आणि पुद्दुचेरी विधानसभेचा कार्यकाळ 8 जून रोजी संपत आहे.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे. निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी याठिकाणी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे सुरु झाले आहेत. तृणमूल काँग्रेस दावा करत आहे की पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार आहे. तर भाजप तृणमूल काँग्रेसला सत्तेतून पायउतार करणार असल्याचं बोलत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कडवी झूंज येथे पाहायला मिळणार आहे.

तमिळनाडू : तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी पक्ष एआयएडीएमके पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळातील विकामकामांची जोरदारी जाहीरात करताना दिसत आहे. तर विरोधी पक्ष डीएमके-काँग्रेस यांची आघाडी आक्रमक दिसत आहे. विरोधी पक्ष सातत्याने एआयडीएमके सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे. यंदाची विधानसभेची पहिली निवडणूक असेल की जी करुणानिधी आणि जे जयललिता यांच्याशिवाय पार पडणार आहे. भाजप एआयएडीएमके याच्यासोबत युती करुन तामिळनाडू निवडणूक लढवणार आहे.

पुद्दुचेरी : पुद्दुचेरी विधानसभेत एकूण 30 जागा आहेत. पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. बहुमत चाचणीत मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलं आहेत. विधानसभेत बहुमत चाचणीच्या आधीच काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं. मागील काही दिवसांपूर्वी चार आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस आमदार लक्ष्मीनारायण यांनीही राजीनामा दिल्यानं ही संख्या पाचवर पोहोचली होती. तसेच सहयोगी पक्ष डीएमकेच्या आमदारांनीही राजीनामा दिल्यानं नारायणसामी सरकार अल्पमतात आलं होतं.

Puducherry Floor Test : पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी

आसाम : आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. सध्या आसाममध्ये सर्बानंद सोनेवाल यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे. काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ), सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएमएल आणि आंचलिक गण मोर्चा यांच्यासोबत आघाडी करणार आहे.

केरळ : केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget