एक्स्प्लोर
Easter Sunday | आज ईस्टर संडे...! हा दिवस का आहे खास
ख्रिसमस, नाताळाप्रमाणेच या दिवशी सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. येशूने पुन्हा जन्म घेतला होता. त्या जन्म सोहळ्याचा आनंद म्हणून ईस्टर संडे हा दिवस साजरा केला जातो.
मुंबई : गुड फ्रायडेनंतर येणारा रविवार जगभरातील ख्रिश्चन बांधवांसाठी खास असतो. मात्र यंदा गुडफ्रायडेसोबत ईस्टर संडे (Easter Sunday) वर देखील कोरोनाचे सावट आहे. ईस्टरच्या तीन दिवस आधी म्हणजेच गुड फ्राय डे (Good Friday) च्यादिवशी येशुंना क्रुसवर चढवण्यात आले होते. यावेळी त्यांनी नितांत यातना देण्यात आल्या, या यातनेतच प्रभू येशूचा अंत झाला होता. मात्र या घटनेच्या तीन दिवसांनंतरच रविवारी येशूने पुन्हा जन्म घेतला होता. त्या जन्म सोहळ्याचा आनंद म्हणून ईस्टर संडे हा दिवस साजरा केला जातो. ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला न येता 21 मार्चनंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्यानंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो. यंदा हा सण 12 एप्रिल म्हणजे साजरा केला जातोय, मात्र तो आपापल्या घरात.
ईस्टर संडेवर कोरोना इफेक्ट
देश तसेच राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चर्च देखील बंदच आहेत. सुरुवातीला गुडफ्रायडेला चर्चच्या क्रॉसला चुंबन करु नये अशा सूचना मुंबईतल्या सर्व चर्चमध्ये देण्यात आल्या होत्या. तसंच कोरोनाच्या भीतीपोटी मुंबईतील 123 चर्चच्या प्रवेशद्वारावर होली वॉटर ठेवण्यात येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने चर्च बंद करण्यात आल्या आहेत. गुडफ्रायडेला देखील सर्व बांधवांनी आपापल्या घरातच सण साजरा केला. आजही जगभरात तशीच स्थिती आहे.
Good Friday | यंदा गुड फ्रायडेवर कोरोनाचं सावट, गुड फ्रायडेचं नेमकं महत्व काय?
हा उत्सव साजरा करण्यामागचं कारण काय?
ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.
ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार ( Good Friday) व होली सॅटर्डे असे आहेत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो. ईस्टरची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन 325 मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बऱ्याच युरोपियन भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात 'प्रभू उठला आहे' असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस 'हो खरच प्रभू उठला आहे' असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो.
ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा
काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. ईस्टरच्या सणात अंड्याला खूप महत्त्व आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजतात. प्रभू कबरीतून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. या दिवशी अंड्याचे कवच रंगबेरंगी आकर्षक ढंगात सजवले जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement