Earthquake In Punjab : पंजाबमधील अमृतसरमध्ये भूकंपाचे धक्के; 4.1 रिश्टर स्केल इतकी तीव्रता
Earthquake In Punjab : गेल्या काही दिवसांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत.
Earthquake In Punjab : पंजाबमधील (Punjab) अमृतसरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता 4.1 इतकी होती. सोमवारी पहाटे 3 वाजून 42 मिनिटांनी अमृतसरसह पंजाबच्या काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचं केंद्र पंजाब, पाकिस्तानमध्ये होतं. भूकंपाची खोली 120 किमी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.
याआधी गेल्या एका आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये दोनदा भूकंपांचे धक्के जाणवले होते. 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले होते. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते .
An earthquake of magnitude 4.1 occurred 145km west-northwest of Amritsar, Punjab, at around 3.42am, today. The depth of the earthquake was 120 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/c565a76ndE
— ANI (@ANI) November 14, 2022
यापूर्वी 9 नोव्हेंबरला भूकंप झाला होता. त्यानंतर भारत, चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह 7 राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचवेळी नेपाळमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाल्याची बातमी समोर आली होती. भूकंपामुळे केवळ अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती, तर 6 जणांचा मृत्यू झाला होता.
का येतो भूकंप?
भूकंपाचं वैज्ञानिक कारण समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्या खाली द्रवरूप लाव्हा आहे आणि त्यावर टॅक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. काही वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. यामुळे जेव्हा डिस्टर्बेंस निर्माण होतो आणि भूकंप होतो.
भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?
भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Earthquake Delhi NCR : दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंप