ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणावर अलहाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी, नक्की वाद काय?
ASI ला ज्ञानवापी मशीदीचे सर्वसमावेशक सर्वेक्षण देण्याचे आदेश दिले होते. यावरच आज अलाहाबाद उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
Gyanvapi: वाराणसीतील ज्ञानवापी मशीदीच्या तळघरात पूजा सुरुच राहणार असल्याच्या निर्वाळा दिल्यानंतर आज ज्ञानवापीच्या स्वच्छतागृहाच्या ASI सर्वेक्षण प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून सुनावणी होणार असून बुधवारी अंजुमन अंजामिया मस्जिद कमिटीच्या वकिलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे १४ ऑगस्टला सुनावणी झाली नाही. जलदगती न्यायालयात सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
अंजुमन व्यवस्था मशीद समिती आज याबाबत न्यायालयात उत्तर दाखल करणार आहे. श्रृंगार गौरी प्रकरणाची मुख्य याचिकाकर्ता राखी सिंगच्या वतीने दिवाणी याचिका दाखल करण्यात आली असून ज्ञानवापीच्या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाप्रमाणेच सीलबंद घराचेही सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
ज्ञानवापीच्या मध्य घुमटाखाली एक उंच शिवलिंग आणि कारागिर विहिरी गाडल्या गेलेल्या असून आदि विश्वेश्वर मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी एक खंदक तयार करण्याची मागणी करत भारतीय पुरातत्व विभागाकडून मशिदीचे अतिरिक्त सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती. सर्वसमावेशक सर्वेक्षणाच्या आदेशाला आव्हान देणारी AIM ची याचिका फेटाळून लावत ASI ला ज्ञानवापी मशीदीचे सर्वसमावेशक सर्वेक्षण देण्याचे आदेश दिले होते. यावरच आज अलाहाबाद उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
ज्ञानवापीच्या संपूर्ण परिसरासह सीलबंद घराचेही सर्वेक्षण
दोन वर्षांपूर्वी कथित शिवलिंग सापडल्यानंतर स्नानगृह सील करण्यात आले होते. मुस्लिम पक्षाने कारंजे तर हिंदू पक्षानं शिवलिंग असल्याचा दावा केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. ज्ञानवापी परिसरांत असलेल्या वाजू खानाच्या ASI सर्वेक्षणाची मागणी केली जाणार आहे. शृंगार गौरी प्रकरणात जिल्हा न्यायाधीश यांच्या निर्णयाविरोधात फिर्यादी राखी सिंगच्या वतीने दिवाणी पुनरिक्षण याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्ञानवापीच्या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाप्रमाणेच सीलबंद घराचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
नक्की वाद काय?
2022 मध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या व्यवस्थापकांनी ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षण करण्याची परवानगी मागण्यासाठी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. मशीद व्यवस्थापन समितीने या आदेशाला आव्हान दिले, परंतु उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला परवानगी दिली. सर्वेक्षणादरम्यान, मशीद परिसरात अनेक हिंदू धार्मिक चिन्हे आणि अवशेष आढळून आले. हिंदू पक्षांनी याचा अर्थ मशीद मंदिरावर बांधली गेली आहे असा दावा केला.मुस्लिम पक्षांनी या दाव्याला नकार दिला आणि म्हटले की हे चिन्हे मशीद बांधण्यापूर्वीच त्या ठिकाणी होते.