एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

नव्या टॅक्स स्लॅबची शिफारस, करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

सध्या 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के कर लागतो, त्याऐवजी 10 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 ऐवजी 20 टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : डायरेक्ट टॅक्स कोडवर स्थापन केलेल्या टास्क फोर्सने आर्थिक मंत्रालयाला सोपवलेल्या अहवालात करप्रणालीत फेररचना करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पॅनलने सरकारला पाच लाखांपासून 20 लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांच्या कराच्या दरात कपात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या असलेला 5 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के टॅक्स स्लॅब हा 5 टक्के, 10 टक्के आणि 20 टक्के करावा, असं अहवालात म्हटलं आहे. सध्या 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के कर लागतो, त्याऐवजी 10 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 ऐवजी 20 टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. पॅनलने 20 लाखांपासून 2 कोटी रुपयांची वार्षिक कमावणाऱ्यांना 30 टक्के तर अतिश्रीमंत म्हणजेच वार्षिक 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या करदात्यांवर 35 टक्के आयकराची शिफारस केली आहे. आयकर कायद्यात सुधारणा करण्यासाठी बदल केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे सदस्य अखिलेश रंजन यांच्या नेतृत्त्वाखालील टार्स फोर्सने 19 ऑगस्ट रोजी आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोपवला होता. परंतु हा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. टास्क फोर्सची स्थापना 58 वर्ष जुन्या आयकर कायद्यात बदल करण्यासाठी केले आहेत. याचा उद्देश आयकरच्या तरतुदी सोप्या बनवणं आणि करदायित्वात सुधारणा करणं हाच आहे. कसा होणार फायदा? सरकारने पॅनलच्या शिफारशी मंजूर केल्या तर वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असणाऱ्या करदात्यांना 20 ऐवजी 10 टक्के आयकर भरावा लागेल. या पॅनलने 10 लाखांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर लावण्याची शिफारस केली आहे. समजा तुमचं उत्पन्न 10 लाख असेल, तर पहिल्या अडीच लाख उत्पन्न करमुक्त असेल. त्यानंतर अडीच ते पाच लाखांसाठी तुम्हाला पाच टक्के कर द्यावा लागेल. पण तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर हा पाच टक्के कर सुद्धा माफ होईल. म्हणजेच तुमचं पहिल्या पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. त्यानंतरच्या पाच ते दहा लाखापर्यंतच्या स्लॅबसाठी दहा टक्के कर लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला 50 हजार रुपये कर भरावा लागेल. सध्याचा टॅक्स स्लॅब कसा आहे? अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न – करमुक्त 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 5 टक्के कर 5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 20 टक्के कर 10 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 30 टक्के कर शिफारशींनुसार नवा टॅक्स स्लॅब असा असेल! अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न - करमुक्त 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न - 5 टक्के कर (परतावा मिळणार) 5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न - 10 टक्के कर 10 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न - 20 टक्के कर 20 लाख ते 2 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न - 30 टक्के 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न - 35 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget