एक्स्प्लोर

Droupadi Murmu Oath Live : द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, 15 व्या राष्ट्रपती म्हणून पदासीन

Draupadi Murmu Oath Ceremony LIVE :  राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

LIVE

Key Events
Droupadi Murmu Oath Live : द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, 15 व्या राष्ट्रपती म्हणून पदासीन

Background

Draupadi Murmu Oath Ceremony : देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आज राष्ट्रपती पद (President) आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या मोठ्या फरकानं विजयी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.  

देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे. 

नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा समारंभानंतर 'गार्ड ऑफ ऑनर'नं सन्मान 

संसदेच्या समारंभानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील, जिथे त्यांना इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर प्रदान केलं जाईल.  मावळत्या राष्ट्रपतींचा शिष्टाचारानुसार सन्मान केला जाईल. 

समारंभासाठी आमंत्रित केलं होतं 

शपथविधी सोहळ्यापूर्वी मावळते राष्ट्रपती आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती संसदेत जातील. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

असा असेल शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम

  • सकाळी 9 वाजून 25 मिनीटांनी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात पोहोचतील
  • राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर नवनियुक्त राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल
  • सकाळी 9 वाजून 50 मिनीटांनी  द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे ताफ्यात एकत्र रवाना होतील.
  • 10 वाजून 3 मिनीटांनी हा ताफा संसदेच्या गेट क्रमांक 5 येथील संसद भवनात पोहोचेल.
  • त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतरांसह सेंट्रल हॉलकडे रवाना होतील.
  • 10 वाजून 10 मिनीटांनी सेंट्रल हॉलमध्ये आगमन आणि राष्ट्रगीत वाजवले जाईल
  • 10 वाजून 15 मिनीटांनी शपथविधी सोहळा
  • 10 वाजून 20 नवीन राष्ट्रपतींचे भाषण
  • 10 वाजून 45  मिनीटांनी नव्या राष्ट्रपती आणि माळते राष्ट्रपती संसदेतून राष्ट्रपती भवनाकडे जातील
  • 10 वाजून 50 मिनीटांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभ
  • 11 वाजता राष्ट्रपती भवनात मावळत्या राष्ट्रपतींना निरोप दिला जाईल
10:38 AM (IST)  •  25 Jul 2022

Droupadi Murmu Oath : राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी, द्रौपदी मुर्मू यांचे शपथविधीनंतर भाषण

Droupadi Murmu Oath  : राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी, द्रौपदी मुर्मू यांचे शपथविधीनंतर भाषण

Droupadi Murmu Oath  : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी मुर्मू यांनी सर्व देशवासीयांचे आभार मानले आहेत,

10:32 AM (IST)  •  25 Jul 2022

Droupadi Murmu Oath Live : पुढील 25 वर्षात आपल्याला 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Droupadi Murmu Oath Live :  पुढील 25 वर्षात आपल्याला 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

10:30 AM (IST)  •  25 Jul 2022

Droupadi Murmu Oath Live : समाजातील प्रत्येक घटकांचा विकास करणार, नवनिर्वाचित राष्ट्रपतींची ग्वाही

10:25 AM (IST)  •  25 Jul 2022

Droupadi Murmu Oath Live : मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 Droupadi Murmu Oath Live : मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

10:23 AM (IST)  •  25 Jul 2022

Droupadi Murmu Oath : मी द्रौपदी मुर्मू... देशाच्या 15व्या राष्ट्रपतींनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ

मी द्रौपदी मुर्मू... देशाच्या 15व्या राष्ट्रपतींनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ

मी द्रौपदी मुर्मू... देशाच्या 15व्या राष्ट्रपतींनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget