DRDO ची नवी सब-मशीनगन ट्रायलमध्ये पास, एका मिनिटात तब्बल 700 राऊंड फायर
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने विकसीत केलेली 5.56x30 एमएम सब-मशीनगन संरक्षण मंत्रालयाच्या प्रायोगिक परीक्षणात पास झाली आहे. लष्कराच्या वापरासाठी तिचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी दिल्ली: DRDO ने विकसीत केलेली 5.56x30 एमएम सब-मशीनगन संरक्षण मंत्रालयाच्या प्रायोगिक परीक्षणात पास झाली आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी माहिती देताना सांगितलं की 5.56 बाय 30 एमएम सब-मशीनगन परीक्षणात पास झाल्याने लष्करात तिचा वापर करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
DRDO द्वारा विकसीत करण्यात आलेली 5.56x30 एमएम ही सब-मशीनगन जॉइन्ट प्रोटेक्टिव्ह व्हेन्चर कार्बाइन गॅस संचलित सेमी अॅटोमॅटिक शस्त्र आहे. यामधून एका मिनीटाला 700 पेक्षा अधिक राऊंड फायर केले जाऊ शकतात. संरक्षण मंत्रालयाच्या अंतिम प्रायोगिक परीक्षणात आवश्यक ती सर्व मानकं पूर्ण करण्यात आली आहेत. याच्या कार्बाईनची प्रभावी रेंज 100 मीटर पेक्षा जास्त आहे. या मशीनगनचे वजन 3 किलोग्रॅम इतकं असून एका हाताचा वापर करुन यातून राऊंड फायर करता येऊ शकतात.
Burst-fire by #JVPC carbine ! pic.twitter.com/bOPpZIcYwF
— Neeraj Rajput (@neeraj_rajput) December 11, 2020
संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे की सोमवारी या सब-मशीनगनचे अंतिम परीक्षण करण्यात आलं आहे. या अगोदर याचा वापर कडक उष्णतेच्या वातावरणात आणि उंच पर्वतावरील कडाक्याच्या थंडीत करण्यात आला आहे. या सर्व परीक्षणात ही सब-मशीनगन पास झाली आहे.
ही सब-मशीनगन गृह मंत्रालयाच्या परीक्षणात या आधीच पास झाली असून त्याचा वापर केंद्रीय सुरक्षा दलात करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या: