एक्स्प्लोर

पहिल्या स्वदेशी बनावटीच्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 (RUDRAM-1) चे यशस्वी परीक्षण.

भारताने शत्रू राष्ट्राच्या रडार व्यवस्थेला उध्वस्त करू शकणाऱ्या रुद्रम 1 ची यशस्वी चाचणी केली.ही देशीची पहिली रेडिएशन विरोधी मिसाईल व्यवस्था आहे. याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट आहे.

नवी दिल्ली: देशातील पहिली स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 (RUDRAM-1) चे भारताने यशस्वी परीक्षण केले. हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या फायटर विमानातून डागण्यात येऊ शकते. या मिसाईलचा वेग हा 0.6 माक ते 2 माक इतका म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट आहे. हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या रेडिएशनच्या सिग्नलला पकडू शकते आणि त्याला नष्ट करू शकते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहनी या क्षेपणास्त्रच्या यशस्वी परीक्षणानंतर ट्विट करुन DRDO आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

हे नव्या पिढीतील स्वदेशी क्षेपणास्त्र DRDO ने बनवले असून त्याची चाचणी बंगालच्या उपसागरातील बालाकोट या स्थानकावरून सकाळी 10.30 वाजता करण्यात आली. या आधी चार दिवसांपूर्वी DRDO ने आणखी एका सबमरिन विरोधी शस्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. भारतीय हवाई दलासाठी ही महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे भारतीय लढाऊ विमाने आता शत्रूच्या प्रदेशात आत पर्यंत शिरून त्यांच्या हवाई दलाची ठिकाणे परिणामकारकरित्या उध्वस्त करू शकतात. नविन पिढीतील रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र किंवा NGARM हे सुखोई 30MKI या लढाऊ विमानावर बसवण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र 500 मीटर ते 15 किलोमीटर इतक्या उंचीवरुन डागण्यात येऊ शकते तसेच 250 किलोमीटर अंतरावरील रेडिएशन नष्ट करू शकते. हवेतून जमीनीवर डागण्यात येणाऱ्या या रडार विरोधी मिसाईलमध्ये अशी साधने बसवण्यात आली आहेत ज्यामुळे अधिक मोठ्या भागातील रेडिएशन पकडू शकते. एकदा हे क्षेपणास्त्र डागल्यानंतरही नंतर त्याचे लक्ष बदलता येवू शकते. या क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेन नौदलातील AGM-88E या क्षेपणास्त्राशी होऊ शकते. त्यामुळे शत्रूने जरी त्यांची रडार व्यवस्था बंद केली तरी हे मिसाईल त्याच्या अपेक्षित लक्षाला नष्ट करू शकते. या आधी भारताने पाणबुडी विध्वंसक 'सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडो' (स्मार्ट) प्रणालीचे सोमवारी ओडिशाच्या तटावरुन यशस्वी परीक्षण केले होते.

संबंधीत बातम्या:

लडाखच्या तणावादरम्यान शीघ्र प्रतिसाद दिल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी केली हवाई योद्धांची प्रशंसा

IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस; वायुदलाच्या चित्तथरारक कसरती

हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Horoscope Today : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 5 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 5 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..ऑक्टोबरचा नवा आठवडा आयुष्याचा गेम पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..ऑक्टोबरचा नवा आठवडा आयुष्याचा गेम पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Embed widget