एक्स्प्लोर
Advertisement
शोभा डेंनी खिल्ली उडवलेल्या पोलिसावर मुंबईत शस्त्रक्रिया होणार!
मुंबई : ज्या लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरुन मध्य प्रदेशचे पोलीस दौलतराम जोगावत यांची खिल्ली उडवली होती, ते दौलतराम जोगावत आता आपलं वजन कमी करणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या मतदानाच्यादिवशी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवर शेअर करुन मुंबईत ''हेवी'' बंदोबस्त, अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. यावरुन डे यांच्यावर चहुबाजूंनी टीकाही झाली. तर शोभा डे यांच्या ट्विटला मुंबई पोलिसांनीही तितकंच संयमी उत्तर दिलं होतं.
दरम्यान शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 1993 पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण आजारपणामुळे शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढलं आणि वजन वाढत गेलं, असं दौलतराम यांनी म्हटलं होतं.
दौलतराम यांचं वजन सध्या 180 किलो इतकं आहे. महत्वाचं म्हणजे डॉ. लकडावाला सध्या जगातील सर्वात जाड महिला इमाम हीचीही शस्त्रक्रिया करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement