(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुगलवर विश्वास नाही का? वयाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं उत्तर
Anand Mahindra: महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा अनेकदा ट्विटरवर त्यांच्या चाहत्यांना खूप मजेशीर उत्तरे देतात आणि त्यांची ही आगळीवेगळी उत्तरे नेटिझन्सची मने जिंकण्यातही यशस्वी ठरतात.
Anand Mahindra: महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra & Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा अनेकदा ट्विटरवर त्यांच्या चाहत्यांना खूप मजेशीर उत्तरे देतात आणि त्यांची ही आगळीवेगळी उत्तरे नेटिझन्सची मने जिंकण्यातही यशस्वी ठरतात. अशातच एका नेटकऱ्याने त्यांना त्यांचे वय (आनंद महिंद्रा वय) विचारले. याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले की, ''तुमचा अंकल गुगलच्या उत्तरावर विश्वास नाही का?'' यानंतर आता आनंद महिंद्रा यांचं वय किती आहे, हे अनेक लोक गुगलवर सर्च करून पाहत आहेत.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या वडिलांची काही पत्र ट्विटरवर शेअर केली. जी त्यांनी 1945 मध्ये फ्लेचर शाळेत प्रवेश घेण्यासाठी लिहिली होती. ही पत्रे 75 वर्षे गोपनीय ठेवण्यात आली होती आणि ती गेल्या वर्षीच सार्वजनिक करण्यात आली होती. आनंद महिंद्रा यांना फ्लेचर शाळेमधील त्यांच्या वर्ग दिनाच्या भाषणात ही पत्रे सुपूर्द करण्यात आली. त्यांनी ही पत्र ट्वीट केल्यानंतर त्यांच्या वयाबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला होता.
So proud to read my father’s audacious aspiration & bold statement while India was still a British colony.I’d never talked to him about those https://t.co/JGTNa9wZnH advice to young people: talk more to & learn more about your parents while they’re around(2/2) @DrSJaishankar pic.twitter.com/ZRfxpez4Gz
— anand mahindra (@anandmahindra) June 4, 2022
आनंद महिंद्रा यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे की, मी माझ्या व्यावसायिक उद्दिष्टांसाठी परराष्ट्र सेवेची निवड केली आहे, कारण माझ्या देशाला आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्ञान असलेल्या लोकांची खूप गरज आहे. सध्या भारताचे स्वतःचे कोणतेही परराष्ट्र धोरण नाही. या युद्धानंतर (World War II)) जर भारताला अधिराज्याचा दर्जा किंवा पूर्ण स्वातंत्र्य मिळाले, तर त्याला परराष्ट्र धोरणात प्रशिक्षित लोकांची गरज भासेल, जेणेकरून ते जगातील इतर देशांशी मैत्रीपूर्ण आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करू शकतील.