Dolly Chaiwala Net Worth : दुबईत ऑफीस, पीएम मोदींना भेटण्याचं स्वप्न, डॉली चायवाल्याची संपत्ती किती? एका दिवसात किती कमावतो?
Dolly Chaiwala Net Worth : डॉली चायवाल्याची (Dolly Chaiwala Net Worth) संपत्ती किती आहे? तो दिवसाला किती रुपये कमावतो?
Dolly Chaiwala Net Worth : आपल्या चहा देण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने चर्चेत आलेला डॉली चायवाला सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. नागपूरमध्ये चहाची टपरी असणारा डॉली चायवाल्याने सोशल मीडियावर त्याची वेगळी ओळख निर्माण केलीये. डॉली चायवाल्याचं खरं नाव सुनील पाटील असं आहे. त्याने चहा बनवण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरील लोकांची मनं जिंकली आहेत. बिल गेट्स (Bill Gates) पासून अनेक दिग्गजांना चहा पाजणाऱ्या डॉली चायवाल्याची (Dolly Chaiwala Net Worth) संपत्ती किती आहे? तो दिवसाला किती रुपये कमावतो? याबाबत जाणून घेऊयात..
View this post on Instagram
डॉली चायवाल्याची संपत्ती किती? एका दिवसात किती कमावतो?
डॉलीची इन्स्टाग्रामवर 30 लाखांपेक्षा जास्त फॉलॉवर्स आहेत. डॉली 7 रुपये प्रति कप या दराने दररोज सरासरी 350 ते 500 कप चहा विकतो. त्यांची रोजची कमाई 2,450 ते 3,500 रुपयांपर्यंत आहे. या छोट्या व्यवसायातून त्यांची एकूण संपत्ती 10 लाखांहून अधिक झाली आहे.
डॉलीने काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये देखील कार्यालय घेतलं
मागील काही महिन्यांपासून डॉली सातत्याने चर्चेत आहे. ऑगस्ट 2024 च्या एका रिपोर्टनुसार, डॉलीकडे 10 लाख रुपयांची संपत्ती आहे. सध्या त्याची संपत्ती आणखी वाढल्याचे बोलले जाते. याशिवाय तो दिवसाला 3 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतो. मिडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे, हे त्याचं स्वप्न आहे. डॉलीने काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये देखील कार्यालय काढलं आहे.
'डॉली की टपरी नागपूर' युट्युब चॅनेलला सुरुवात
बिल गेट्स (Dolly Chaiwala meets Bill Gates) यांनी त्याच्या टपरीवर चहा पिला, त्यानंतर डॉलीला वेगळी ओळख मिळाली. डॉली चायवाला आणि बिल गेट्स यांची भेट शूट देखील करण्यात आली होती. आणि ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्याच्या चहाच्या स्टॉलशिवाय, त्याचे एक यशस्वी YouTube चॅनेल देखील आहे. त्याचे नाव 'डॉली की टपरी नागपूर' असून त्याचे 14.6 लाख सबस्क्राईबर आहेत.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या