एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औषध चाखल्यानंतर 9 वर्षांपासून कोमात, 46 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू
कोची : औषध चाखल्यामुळे 9 वर्षांपूर्वी कोमात गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. 46 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टर पीए बैजू यांचं राहत्या घरी निधन झालं.
डॉ. बैजू हे वैद्यकीय अधिकारी म्हणून तामिळनाडूतील सरकारी रुग्णालयात कार्यरत होते. जानेवारी 2007 मध्ये हाडांशी संबंधित समस्येतून एक महिला त्यांच्याकडे आली. डॉ. बैजू यांनी प्रिस्क्राईब केलेले औषध घेतल्यानंतर ती बेशुद्ध पडली.
महिलेच्या कुटुंबीयांनी याची माहिती डॉक्टरांना दिली. त्यानंतर कशायम हे त्यांनी लिहून दिलेले आयुर्वेदिक औषध घेऊन येण्यास डॉ. बैजू यांनी कुटुंबीयांना सांगितलं. संबंधित औषध अपायकारक नसल्याचं पटवून देण्यासाठी डॉक्टरांनी ते चाखलं. त्यानंतर ते कोमात गेले.
नऊ वर्षांनंतर आज डॉ. बैजू यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ऑटोप्सीसाठी मुवत्तुपुझामधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
सोलापूर
निवडणूक
Advertisement