एक्स्प्लोर
डॉक्टरांनी पुकारलेला 12 तासांचा संप मागे
खाजगी रुग्णालयातील बंद असलेल्या सेवा त्वरित सुरु करण्याचं आवाहन आयएमएकडून सर्व खाजगी रुग्णालयांना करण्यात आलं.
मुंबई : देशभरातील डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. सकाळपासून बंद असलेल्या खाजगी रुग्णालयांतील सेवा तात्काळ सुरु करण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे.
मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया बरखास्त करुन त्याजागी नॅशनल मेडिकल कमिशन आणण्यासंबंधी विधेयकावर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज देशातील डॉक्टर संघटनांनी बारा तासांचा बंद पुकारला होता.
नॅशनल मेडिकल काऊंन्सिल विधेयकाविरोधात देशभरातले डॉक्टर आज संपावर
मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा संप नियोजित होता. मात्र दुपारी तीनच्या सुमारास हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर खाजगी रुग्णालयातील बंद असलेल्या सेवा त्वरित सुरु करण्याचं आवाहन आयएमएकडून सर्व खाजगी रुग्णालयांना करण्यात आलं. मुंबई आणि ठाण्यातील डॉक्टरांनी ‘ब्लॅक डे’ पाळला. ठाणे जिल्ह्यातील सुमारे 600 पेक्षा जास्त डॉक्टर संपावर गेले. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपत्कालीन व्यवस्था सुरु राहण्याची खबरदारी डॉक्टर घेणार होते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement